आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरींच्या प्रतिमेसाठी सरकारची उधळपट्टी, पैशाचा दुरुपयोग झाल्याचे उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात प्रसिद्ध जाहिरातीची सामग्री आणि खर्चावर दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकार आरोपाच्या पिंजऱ्यात अडकले आहे. केंद्राद्वारे स्थापन कंटेंट रेग्युलेशन कमिटीच्या चौकशीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपची प्रतिमा उजळवण्यासाठी या जाहिराती दिल्याचे उघड झाले. ही बाब सरकारी तिजोरीचा दुरुपयोग असल्याचे मान्य करत समितीने आपकडून पैसे वसूल करण्यास सांगितले आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाने माजी मुख्य निवडणूक आयुक्त बी.बी. टंडन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली. काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्ली सरकारच्या जाहिरातींबाबत समितीला तक्रार दिली होती. शुक्रवारी जारी आदेशात समितीने सांगितले की, दिल्ली सरकारने जाहिरातीसंबंधी सर्वाेच्च न्यायालयाच्या दिशा-निर्देशांचे उल्लंघन केले आहे. समितीमध्ये जाहिरात निर्माता पीयूष पांडे आणि पत्रकार रजत शर्मा यांचाही समावेश आहे. समितीने सहा प्रकरणात दिल्ली सरकारच्या जाहिराती या सर्वाेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे मान्य केले. जाहिरातींवरील खर्चाचा आढावा दिल्ली सरकारच करणार आहे.

आमदाराविरुद्ध तक्रार
दिल्लीतील रोहतासनगरच्या आम आदमी पार्टीच्या आमदार सरिता सिंह यांच्याविरुद्ध त्यांच्याच पक्षाचे स्थानिक नेते शकील अहमद यांनी वेलकम ठाण्यात तक्रार दिली. सिंह यांनी नोकरीचे आमिष दाखवून तीन तरुणांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार सरिता सिंह यांनी आरोपाचा इन्कार केला.
बातम्या आणखी आहेत...