आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली सरकारच्या विरोधात बातम्या दाखवल्यास कारवाई करणार अरविंद केजरीवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माध्यमांवर आम आदमी पक्षाला संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांना एक फर्मान जाहीर केले आहे. त्यानुसार माध्यमातील एखाद्या बातमीमुळे दिल्ली सरकार अथवा मुक्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होऊ शकते असे सरकारशी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला वाटले तर ते याबाबत थेट मुख्य सचिवांकडे तक्रार करू शकतात. त्यानंतर मुख्य सचिव याचा अभ्यास करून ते प्रकरण दिल्ली सरकारच्या कायदे मंत्रालयाकडे पाठवले जाईल. त्यानंतर संबंधित वृत्ता देणाऱ्या संस्थेविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. केजरीवाल सरकार अशा प्रकारच्या वाहिन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याचीही शक्यता आहे.

कंटेंट मॉनिटरींगला सुरुवात
दिल्लीच्या केजरीवाल सरकारने माध्यमांमधील कंटेंवर लक्ष ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे. आम आदमी पार्टीने त्यांच्या अधिकाऱ्यांना माध्यमांच्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासही सांगितले आहे. या प्रकरणी माहिती आणि जाहिलात संचलनालयाला सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत वृत्त वाहिन्यांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

माहिती ठेवणे सुरू
दिल्ली सरकारने मीडियावर नजर ठेवण्याचे निर्देश दिल्यानंतर अधिकारी अशा प्रकारच्या बातम्यांचे रेकॉर्ड ठेवत आहे. त्या आधारे या कंटेंटचा रिपोर्ट रोज मुख्मंत्री कार्यालयाला पाठवला जात आहे. अशा प्रकारे एक महिना काम करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर सरकार एका निविदेद्वारे सर्व वृत्त वाहिन्यांवर निगराणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

विरोधकांचा हल्ला
दिल्ली सरकारच्या या आदेशावसर काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले की, आजपर्यंत असे कधीही झालेले नाही. सरकारला आपली वचने पूर्ण करता येत नसल्याचे ते कारणे शोधत आहेत, असेही माकन म्हणाले. तर माध्यमांनी दिल्ली सरकामधील कमकुवतपणा जगासमोर आणल्याने केजरीवाल नाराज आहेत. त्यामुळे ते माध्यमांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत.