आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत मुलीला मृत घोषित केले, दोषी सापडल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करू; दिल्ली सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. - Divya Marathi
दिल्ली सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

नवी दिल्ली - राजधानीतील रुग्णालयाच्या कथित निष्काळजीपणाची दखल थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली आहे. या रुग्णालयाने नुकतेच जन्मलेल्या जुळ्या बाळांना मृत घोषित केले. यानंतर त्यापैकी एक बाळ जिवंत असल्याचे समोर आले. त्यावर प्रतिक्रिया देताना दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी शनिवारी कठोर कारवाईचा इशारा दिला. या प्रकरणात गुन्हेगारी स्वरुपाच्या निष्काळजीपणा या दिशेने चौकशी सुरू आहे. रुग्णालयाचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास त्यांचा परवाना रद्द करू असे त्यांनी स्पष्ट केले. शालीमार बाग परिसरातील मॅक्स हॉस्पिटल संदर्भात ते बोलत होते. याच रुग्णालयात गुरुवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

 

जिवंत मुलीना पॉलिथीनमध्ये गुंडाळले
> पीडित मुलीचे वडील आशीष यांनी सांगितल्याप्रमाणे, 27 नोव्हेंबर रोजी त्यांची पत्नी वर्षा हिला प्रसव वेदनेनंतर मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अॅडमिशनच्या वेळीच डॉक्टरांनी तिची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले होते. 
> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा ने गुरुवारी सकाळी अपरिपक्व जुळ्यांना (मुलगा आणि मुलगी) जन्म दिला होता. ते दोघेही जिवंत जन्मले होते. यानंतर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित करून एका पॉलिथिनमध्ये पॅक केले आणि नातेवाइकांना सुपूर्द केले. 
> संध्याकाळी कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी स्मशानाला जात होते, त्याचवेळी प्लास्टिकच्या बॅगेत हालचाली दिसून आल्या. पॅकेट उघडताच त्यातील मुलीचा श्वास सुरू होता. त्यांनी वेळीच पश्चिम विहार येथील मॅक्स रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. तेथे बाळांना लाइप सपोर्टवर ठेवण्यात आले. 

 

डॉक्टरांनी मागितले 50 लाख
आशीषने लावलेल्या आरोपानुसार, डॉक्टरांनी दोन्ही नवजातांना अतिशय अत्यवस्थ म्हणत नर्सरीत ठेवण्याचा सल्ला दिला. यासाठी 50 लाख रुपये खर्च येणार म्हणत पैश्यांची मागणी केली. त्यापैकी काही रक्कम आशीषने रुग्णालयात जमा देखील केली. दुसऱ्याच दिवशी रुग्णालयाने दोघांनाही मृत घोषित केले. 


हॉस्पिटलने काय म्हटले?
मॅक्स हॉस्पिटलने शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे, "अपरिपक्व जन्मणाऱ्या नवजातांना नर्सिंग होममध्ये लाइफ सपोर्ट देऊन ठेवण्यात आले होते. ते जिवंत असल्याची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे, शालीमार बाग येथील रुग्णालयाने त्यांना कुटुंबियांकडे सुपूर्द केले होते. 30 नोव्हेंबर रोजी वर्षाने जुळ्यांना जन्म दिला होता. त्यापैकी एक स्टिलबॉर्न (पूर्णपणे न विकसित झालेले) होते. या घटनेने आम्ही देखील हादरलो. गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आणि संबंधित डॉक्टरांची सुट्टी केली." पीडितांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...