आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Invites Fresh Controversy By Retweeting Dadlani\'s Comment

RETWEET करुन केजरीवालांनी ओढवून घेतला वाद, YOUTUBEवर उडत आहे खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावून उत्तर देण्यास सांगितले आहे. तर, दुसरीकडे सायबर वर्ल्डमध्ये केजरवाल यांनी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. सोमवारी रात्री केजरीवाल यांनी बॉलिवूडचे संगीतकार विशाल ददलानी यांनी केलेल्या ट्विटला रिट्विट करुन हा वाद आंगावर घेतला आहे. तर, यूट्यूबवर त्यांच्यावरील एक सटायर लोकप्रिय होत आहे, तर काही लोक त्याचा विरोधही करीत आहेत.
संगीतकार विशाल ददलानी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव न घता म्हटले होते की,‘एक मूर्ख आणि दुसरा खुनी यात अडकलो आहोत.. आता देश करणार काय?’ ददलानी यांचा रोख राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. त्यांनी कोणाचेही नाव न घेता राहुल यांना मोरन (मुर्ख) आणि मोदींना मर्डरर (खुनी) म्हटले होते. राहुल गांधी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर ददलानी यांनी हे ट्विट केले होते. ददलानी हे आम आदमी पार्टीचे समर्थक असून त्यांनी 'आप'साठी अनेक म्यूझिक शो केले आहेत.
भाजपचा हल्ला
भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सितारमन यांनी केजरीवाल यांच्या ट्विटवर टीका केली आहे. सितारमन यांनी केजरीवाल यांना अशा ट्विटचे समर्थन करण्यापासून दूर राहाण्याचा इशारा दिला आहे.
एकाच महिन्यात वादांची श्रृंखला
28 जानेवारी रोजी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र एकाच महिन्यात केजरीवाल सरकार आणि आपला अनेक वादांना सामोरे जावे लागले आहे. केजरीवालांच्या सरकारमधील मंत्री सोमनाथ भारती यांची मध्यरात्री परदेशी महिलांच्या घरी छापेमारी, रेल्वे भवनसमोरील पार्कमधील केजरीवाल यांचे धरणे आंदोलन आणि आपचे आमदार विनोदकुमार बिन्नींची पक्षातून हकालपट्टी यामुळे, 'घरोघरी मातीच्या चुली' म्हणण्याची जनतेवर वेळ आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काय आहे व्हिडिओमध्ये