आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचतारांकितची हौस नाही, रस्त्यावरील पाणीपुरीचे दिवाने आहेत मुख्यमंत्री केजरीवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री बनले आहेत. दिल्लीचा तख्त काबीज करुन ते जनतेसाठी खास बनले असले, तरी ते मात्र तसे मानत नाहीत. त्याचे कारण त्यांना साधेपणा प्रिय आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे महत्त्व वाढले आहे. त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झाले आहे. मात्र केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतरही पहिल्यासारखेच आयुष्य जगणार आहेत. त्याची सुरवातही त्यांनी केली आहे. शपथविधीसाठी ते मेट्रोन आले आणि नंतर स्वतःच्या वॅगन आर कारने रामलिला मैदानावर पोहोचले.
सत्ता आणि पैसा मिळाल्यानंतर थाटात राहायला कोणाला आवडत नाही. अनेकांचे राहाणीमान आणि खान-पान बदलते. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल मुले आणि पत्नीसह कोणत्याही पंचतारांकित हॉटेलला पसंती न देता रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाडीवर पाणीपुरी खाणे पसंत करतात. केजरीवाल म्हणतात, मुख्यमंत्री झाल्यानंतरही माझी ही सवय बदलणार नाही.
गाझीयाबाद येथील कौशींबी येथील त्यांच्या घराजवळ असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर ते नेहमी असे पाहायला मिळतात. आयकर विभागात अधिकारी राहिलेले केजरीवाल आता मुख्यमंत्री झाले आहेत, मात्र ते जर कधी दिल्लीच्या रस्त्यांवर पाणीपुरी खाताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको. त्यांची हीच सवय त्यांना 'आम आदमी' ही ओळख कायम ठेवते.
त्यांची पत्नी सरकारी अधिकारी आहे. त्यांनी मात्र सरकारी नोकरी सोडून सत्तेच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचा मार्ग निवडला आहे. त्यांच्या या निर्णयाचा त्यांच्या कुटुंबियांनाही अभिमान आहे. त्यांच्या काकांचे म्हणणे आहे, की केजरीवाल कायम म्हणत होते की काही तरी भव्य करायचे आहे. ते त्यांनी आज करुन दाखवले आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या केजरीवाल यांच्या कुटुंबियांबद्दल...