आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Not Having Proper Support By His Party Members

अरविंद केजरीवालांना 6 जुनपर्यंत कोठडी, जामिनाची रक्कम भरण्यास पुन्हा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या मानहानी प्रकरणी जामिनासाठी 10,000 रुपये देण्यास पुन्हा नकार दिल्याने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या न्यायालयाने 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी बजावली आहे.
अरविंद केजरीवाल यांना आज (शुक्रवार) मॅजिस्ट्रेटसमोर सादर करण्यात आले. केजरीवाल यांनी जामिनासाठी रक्कम भरण्यास नकार दिला. त्यांनतर केजरीनाल यांना न्यायालयाने 6 जुनपर्यंत न्यायालयीन कोठडी बजावली. यावेळी संतप्त झालेल्या केजरीवाल यांनी मॅजिस्ट्रेटसमोरच गडकरी भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले. त्यामुळे गडकरी यांचे वकील चिडले. त्यांनी यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर जेलच्या व्हॅनमध्ये बसवून केजरीवाल यांना तिहार तरुंगात नेण्यात आले.
एकिकडे केंद्रात नवीन सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडल्याचे दिसून येते.
दरम्यान त्यांच्या पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी जामिनाची रक्कम भरून स्वतःची सुटका करून घेतली आहे. या दोघांसह पक्षाच्या इतर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांना एकाकी सोडल्याचे दिसून येते.
नाही गेले आमदार
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर आम आदमी पक्षाच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना तिहार तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा आदेश देण्यात आला होता. तरीही केवळ 150 आमदार-कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले होते. अनेक आमदारांनी आंदोलन न करता घरीच बसणे पसंत केले होते. केजरीवाल यांच्यासह मनिष शिसोदिया आणि जर्नेलसिंग यांनाही अटक झाली होती. परंतु, दोघांनी जामिनाची रक्कम भरून स्वतःची सुटका करून घेतली आहे. त्यानंतर आपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते केजरीवाल यांना जामिनासाठी समजावत होते. तरीही केजरीवाल यांनी त्यांचे काही एक ऐकले नाही. त्यामुळे केजरीवाल आणि आमच्या वरिष्ठ नेतृत्वात मतभेद उफाळून आल्याचे दिसून येते.
वरिष्ठ नेतृत्व एकसंध नाही
आपचे वरिष्ठ नेते कुमार विश्वास यांना अमेठीत जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. डिपॉझिट जप्त झाल्याने ते काही दिवसांच्या एकांतवासात गेले आहेत. याची माहिती त्यांनी फेसबुकवर दिली आहे. अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी बजावलेली असल्याने पक्षात असंतोषाचे वातावरण असले तरी कुमार विश्वास या घडामोडींपासून दूर आहेत. आपच्या आणखी एक धाडाडीच्या नेत्या शाजिया इल्मी गेल्या काही दिवसांपासून दिसलेल्या नाहीत. पक्षात त्यांच्याबद्दल बराच असंतोष असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांचे सहकारी मनिष शिसोदिया यांच्या वडीलांचा मृत्यू झाला असल्याने ते सध्या केजरीवाल यांना साथ देण्याच्या परिस्थितीत नाहीत.
लोकसभा निवडणुकीतील नामुष्कीनंतर आम आदमी पक्षाला मिळणाऱ्या निधीत झाली घट...वाचा पुढील स्लाईडवर