आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या उपस्थितीतील प्रजासत्ताक परेडला केजरीवालांना निमंत्रण नाही, झाले नाराज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या परेडसाठी केंद्र सरकारतर्फे देश- विदेशातील सर्व व्हीआयपी व व्हीव्हीआयपींना निमंत्रित केले जाते. यंदाही अनेक बड्या हस्तींना निमंत्रित केले आहे. मात्र, दिल्लीत भाजपला जोरदार टक्कर देत असलेल्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांना अजून निमंत्रण मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहेत.
माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की, मी परेड पाहण्यासाठी जाऊ इच्छितो. मात्र, मला अद्याप निमंत्रणच मिळाले नाही. किमान यावरूनही तरी राजकारण केले जाऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे.
दरवर्षी होणा-या प्रजासत्ताक दिनावर सरकार एवढ्या पैशांची उधळपट्टी का करते असा सवाल गेल्या वर्षीच अरविंद केजरीवाल यांनी विचारला होता. मात्र, आता आपल्याला प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही म्हणून नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. असे असले तरी केजरीवाल यांनी मागील वर्षी दिल्लीतील प्रजासत्ताक परेडमध्ये सहभाग घेतला होता. कारण गेल्यावर्षी या कालावधीत ते दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते.
भाजपनेही केजरीवालांना दणका दिला आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला कोणत्याही माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेले नाही. तसेच माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणे असा काही प्रोटोकॉलही नाही, असे भाजपने केजरीवालांना लक्षात आणून दिले आहे.