आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Press Conference Disturbed By Congress MLA, Demanded Batla Encounter Prob

केजरीवाल यांची पत्रकार परिषद काँग्रेस आमदाराने उधळली, बाटला चकमकीची चौकशीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदार आसिफ मोहंमद यांनी चांगलाच गोंधळ घातला. केजरीवाल यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बाटला हाऊस चकमकीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मोहंमद यांनी केली. त्याचबरोबर भलेही काँग्रेसने हकालपट्टी केली तरी चालेल, मी केजरीवाल यांच्याविरुद्ध मत देणार, असा इशाराही त्यांनी दिला.


दिल्ली सचिवालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी सरकारने महिन्यात केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर करण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली होती. त्यानुसार केजरीवाल यांनी सरकारच्या कामांचा पाढा वाचला. दिल्लीत पैशांची कमतरता नाही. मागील सरकारकडे काम करण्याची नियत नव्हती. लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळात शनिवारी प्रस्ताव आणला जाणार आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. बाटला हाऊस चकमकीची विशेष तपास दलाकडून चौकशी करण्यात येणार नसल्याचे केजरीवाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. त्यानंतर तेथे उपस्थित काँग्रेस आमदार मोहंमद चांगलेच भडकले. ते तावातावाने बोलू लागले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गोंधळामुळे केजरीवाल तेथून निघून गेले.


आप सरकारची शिफारस फेटाळली
बरखा सिंह यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षापदावरून हटवण्याची दिल्ली सरकारची शिफारस नायब राज्यपाल नजीब जंग यांनी फेटाळून लावली आहे. सरकार कोणत्या आधारे आयोगाची पुनर्रचना करणार आहे, असा सवाल जंग यांनी केला. तत्पूर्वी केजरीवाल यांनी बरखा सिंह एका राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.