आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Says Communalism Bigger Threat Than Graft, Latest News In Divya Marathi

केजरीवाल यांचा यू-टर्न: भ्रष्‍टाचारापेक्षा सांप्रदायिकता हा कळीचा मुद्दा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील भ्रष्‍टाचार नष्ट झाल्यानंतर सर्व प्रश्न सुटतील, असे म्हणणारे व भ्रष्‍टाचाराच्‍या मुद्यावर देशभर रान उठवणारे 'आप'चे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मात्र यूू- टर्न घेतला आहे. भ्रष्‍टाचारापेक्षा सांप्रदायिकता हा कळीचा मुद्दा असल्‍याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

देशामध्‍ये ज्‍या जातीय दंगली होतात, त्‍यामध्‍ये लोक आपापसात लढत नाहीत, तर जातीवादी राजकीय पक्ष आपल्‍या स्‍वत:च्‍या फायद्यासाठी सर्वसामांन्‍य लोकांना लढवतात व आपला राजकीय स्‍वार्थ साधतात. आजपर्यंत सत्तेमध्‍ये असणा-या कॉंग्रेसने मुस्लिमांसाठी काही केले नाही. हिंदूत्‍वाच्‍या मुद्यावर राजकारण करणा-या भाजपने तरी कुठे हिंदूचे प्रश्‍न सोडवले ? असा प्रश्‍न केजरीवाल यांनी उपस्थित केला. बुद्धीजीवी आणि धार्मिक नेत्‍यांनी इंडिया इस्‍लामिक कल्‍चरल सेंटरमध्‍ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते. 'दिव्‍य मराठी'ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये मात्र देशात मोदीची लाट असल्‍याचे केजरीवाल यांनी मान्‍य केले आहे.