आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Says \'fever Gone\', First Day In Office News In Marathi

मनिष सिसोदियांनी अर्ध्यात सोडली पत्रकार परिषद, प्रवेश बंदीमुळे पत्रकारांचा गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारच्या पहिल्या दिवशीच दिल्ली सचिवालयात पत्रकारांना प्रवेश बंदी घालण्यात आली. यावरून पत्रकारांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अर्ध्यात पत्रकार परिषद सोडली.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांना सचिवालयात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. 'आप' सरकारच्या मंत्रिमंडळाची आज (सोमवारी) पहिली बैठक झाली. सिसोदिया बैठकीला आल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी सचिवालयात प्रवेश बंदी घालण्यात आल्यावरून त्यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सिसोदिया यांनी अर्ध्यातच पत्रकार सोडून बाहेर निघून गेले.

पत्रकारांना सचिवालयात प्रवेश करू देऊ नये, असे आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले असल्याचे एक सुरक्षा रक्षकाने सांगितले आहे. परंतु यासंदर्भात अधिकार्‍यांशी संपर्क साधला असताना त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

यापूर्वी देखील केजरीवाल सरकारने पत्रकारांवर अंकुश लावला होता...
यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने पत्रकारांवर अंकुश लावला होता. 2013 मध्ये केजरीवाल यांनी दिल्लीत पहिल्यांदा 'आप'चे सरकार स्थापन केले होते. त्यावेळी पत्रकारांना पहिल्याच दिवशी सचिवालयात प्रवेश करण्‍यास निर्बंध घातले होते. त्याचप्रकाणे यावेळी देखील केजरीवाल सरकारने पहिल्याच दिवशी पत्रकारांना सचिवालयात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

केजरीवाल सरकारद्वारा पत्रकारांसाठी 'ब्रीफिंग रूम' तयार करण्‍यात आला आहे. पत्रकारांना फक्त ब्रीफिंग रुम येण्यास परवानगी आहे. या ब्रीफिंग रूममध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाल्यामुळे सिसोदिया पत्रकार परिषद सोडून निघून गेले.

मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली...
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. स्वस्त वीज, पाणी आणि अन्य मुद्यांवर चर्चा झाली. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कामाला लागावे, असे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच सकाळी 11 वाजून 45 मिनिटांला दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, केजरीवाल यांनी केलेले 'ट्वीट'