आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्री होणारे केजरीवाल दुसरे \'आयआयटी\'यन, या मंत्र्यांनीही घेतले IITमधून शिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री म्‍हणून विराजमान झालेले अरविंद केजरीवाल हे उच्‍चशिक्षित आहेत. 'आयआयटी'सारख्‍या संस्‍थेतून त्‍यांनी शिक्षण पूर्ण केले. त्‍यानंतर राजस्‍व सेवेतही त्‍यांनी यश मिळविले होते. आयआयटीयन मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान होण्‍याची ही दुसरी वेळ आहे. आयआयटीमधून शिक्षण घेऊन मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान होणारे गोव्‍याचे मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर हे पहिले. मुख्‍यमंत्रीपदावर नाही, परंतु, कॅबिनेट मंत्रीपदावर काही आयआयटीयन्‍स आज बसले आहेत. केंद्रीय मंत्री अजीत‍ सिंह हे त्‍यापैकीच एक. महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण या यादीत बसत नाही. परंतु, त्‍यांनीही आयआयटीच्‍या तोडीच्‍या बिट्स पिलानी येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या देशातील उच्‍च विद्या विभुषित मुख्‍यमंत्री आणि इतर मंत्र्यांना...