आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करा! केजरीवाल यांचे मुख्य सचिवांना अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मतदान यंत्राचा (ईव्हीएम) गैरवापर हाेऊ शकताे, अाता काेणताही धाेका पत्करायचा नाही, असा पवित्रा घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महापालिकेच्या निवडणुका या छापील मत पत्रिकेद्वारे व्हाव्यात यासाठी अावश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्लीच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

उत्तरप्रदेशातील निकालानंतर मायावतीसह सर्वच िवराेधी पक्षाने इव्हीएममध्ये घाेळ करण्यात अाल्याचा अाराेप केला होता. निवडणूक अायाेगाने ही बाब फेटाळून लावली असली तरी भाजप वगळता सगळेच पक्ष ताकही फुंकून प्यायला लागले अाहेत. याची प्रचिती मंगळवारी अाली.  अाम अादमी पार्टीचा पंजाबमध्ये अपेक्षा भंग झाला तर गाेव्यात एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. महाराष्ट्रातही नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले, तिथेही मतदान यंत्रामध्ये सेटिंग करण्यात अाल्याच्या तक्रारी माेठ्या प्रमाणात झाल्या अाहेत. 

केजरीवाल यांनाही इव्हीएममध्ये सेटिंग केले जाऊ शकते असे वाटायला लागले अाहे. अाता दिल्लीतील महापालिकांच्या निवडणुका हाेऊ घातल्या अाहेत. दिल्ली महापालिका भाजपच्या ताब्यात  असल्या तरी  दिल्ली सरकारतर्फे महापालिकेच्या निवडणुका .आयोजित केल्या जातात, या निवडणुकांमध्ये अाम अादमी पार्टीला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा अाहे. मात्र, ही निवडणूक पारदर्शक व्हावी या मताचे केजरीवाल असल्याने त्यांनी बॅलेटपेपरवरच मतदान घेण्यासाठी सूचना दिल्या अाहेत. असे असले तरी  दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांची मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर नेमकी काय भूमिका आहे ते स्पष्ट 
हाेऊ शकले नाही.

ईव्हीएमनेच मतदान होणार असल्याचे स्पष्ट
दिल्लीत २२ एप्रिल रोजी तीन पालिकांसाठी मतदान होईल. ही प्रक्रिया मतदान यंत्राद्वारे पूर्ण केली जाईल. मतपत्रिका छापण्याची अडचण नाही. परंतु एवढ्यात मतपेटी तयार करण्याचे काम बंद झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ईव्हीएमद्वारेच पार पडेल, असे निवडणूक आयुक्त एस.के. श्रीवास्तव यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...