आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kejriwal Writes To DU Vice Chancellor Requesting Him To Make Narendra Modi BA MARKSEETS Public

पंतप्रधानांची पदवी सार्वजनिक करावी, BAच्या डिग्रीवरून केजरींचा निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. केजरीवाल यांनी मोदींच्या BA च्या डिग्रीवर सवाल उपस्थित केले आहेत. केजरीवाल यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या (DU) कुलगुरुंना पत्र लिहून नरेंद्र मोदींची पदवी वेबसाइटवर अपलोड करण्‍याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर केजरीवाल यांनी डीयूला पाठवलेले पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांनी बुधवारी 'ट्वीट' करून वृत्तपत्रात दाखवण्यात आलेली मोदींची डिग्री बनावट असल्याची टीका केली होती.

केजरीवाल यांनी काय लिहिले पत्रात...
- केजरीवाल यांनी कुलगुरुंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मागील काही दिवसांपासून पंतप्रधना नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून वाद सुरु आहे. दिल्ली यूनिव्हर्सिटीमधून त्यांनी BA चे केले की नाही? हा सवाल उपस्थित करण्‍यात आला आहे.
- मोदींनी दिल्ली यूनिव्हर्सिटीतून कोणतीही डिग्री घेतली नसल्याचीही चर्चा आहे. दिल्ली यूनिव्हर्सिटीत मोदींच्या नावाची कुठेही नोंद नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
- हे प्रकरणी दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. मोदी यांनी गुजरात यूनिव्हर्सिटीमधून एमएपर्यंत शिक्षण केले. मोदींची एमएची डिग्री बनावट असल्याचा संशय आहे.
- पंतप्रधानांचे शिक्षण काय? हे जाणून घेण्याचा देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. डिग्रीवरून पंतप्रधानांवर इतके गंभीर आरोप होत असतील तर ती डिग्री सार्वजनिक व्हायला हवी, असे केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, केजरीवाल यांनी दिल्ली यूनिव्हर्सिटीच्या कुलगुरुंना लिहिलेले पत्र...
बातम्या आणखी आहेत...