आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keral Congress, CPI Ministers, MLA Will Visit Gujrat Development

मोदी यांचे विकासाचे दावे खोटे ठरवणा-या काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार गुजरातच्या वाटेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे विकासाचे दावे खोटे ठरवणा-या काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार या विकासकामांचा अभ्यास करण्यासाठी गुजरातच्या वाटेवर निघाले आहेत.केरळमधील सत्ताधारी कॉँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ येत्या आठवड्यात शहरी विकास योजनांचा अभ्यास करण्यासाठी गुजरात दौ-यावर जाणार आहे. काँग्रेसने मोदी यांचा ‘गुजरात मॉडेल’म्हणून प्रसिद्ध झालेल्या विकासाचा दावा फोल ठरवणारी 32 पानी पुस्तिका नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या पार्श्वभूमीवर केरळ काँग्रेसच्या मंत्र्यांचा हा दौरा होत आहे, हे इथे उल्लेखनीय आहे.
केरळ विधानसभेच्या स्थानिक प्रशासन, ग्रामीण विकास या विषयावरील विधानसभा समितीने या दौ-याचे आयोजन केले आहे. दौ-यात काँग्रेस, माकप, मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस-मणी, भाकप आणि नॅशनल सेक्युलर कॉन्फरन्सचे आमदार सहभागी होणार आहेत. 11 सदस्यीय शिष्टमंडळात ग्रामीण विकास मंत्री के.सी. जोसेफ, अर्थमंत्री के.एम. मणी, शहरी व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मंजलमकुझी अली आणि पंचायत व समाजकल्याण मंत्री एम.के. मुनीर यांचा समावेश आहे. शिष्टमंडळ 12 रोजी सुरतला पोहोचणार आहे. या वेळी ते राज्य सरकारमधील अधिका-यांसोबत शहरातील सांडपाण्याच्या व्यवस्थेवर चर्चा करतील. जोसेफ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, मणी केरळ काँग्रेसचे (मणी) प्रमुख आहेत. केरळमधील सत्ताधारी यूडीएफ आघाडीतील हा छोटा घटक पक्ष आहे. अली आणि मुनेर मुस्लिम लीग पक्षाचे नेते आहेत. के. अच्युतन (काँग्रेस), सी. मामुथी (मुस्लिम लीग), पी.टी.ए. रहीम (नॅशनल सेक्युलर कॉन्फरन्स), व्ही. शिवनकुथ्थी, पी. श्रीरामकृष्णन, के. व्ही. विजयदास (माकप) आणि ई.के. विजयन (भाकप) यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिष्टमंडळ काही पर्यटनस्थळांना भेटी देणार आहे.
मोदींच्या खोटारड्या विकासावर काँग्रेसची पुस्तिका
विविध मानकांवर आधारित गुजरातचा विकास फोल ठरवणारी 32 पानी पुस्तिका काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी देशात गुजरातवर सर्वाधिक कर्ज असल्याचे म्हटले आहे. यानंतर काँग्रेस मंत्र्यांचा सहभाग असलेले शिष्टमंडळ गुजरातच्या विकासकामांचा अभ्यास करण्यासाठी जात आहे.