आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार दिवस उशिराने मान्सून केरळात, दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अखेर दक्षिण-पश्चिम मान्सून केरळात दाखल झाला आहे. चार दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये आला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) 48 तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता बुधवारी व्यक्त केली होती. साधारण 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. अरबी समुद्रात लक्षद्विप येथे शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टीवर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यासोबत मान्सुन पुढे सरकण्यासाठी अनुकुल परिस्थिती आहे.
गेल्या 48 तासांत केरळात चांगला पाऊस झाला होता. राज्यातील 70 टक्के भागात जवळपास 2.5 मिलीमिटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मान्सून पुढे सरकत असून 25 जूनपर्यंत पश्चिमोत्तर राज्यांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागने पुढील दोन दिवसांमध्ये केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डी.एस. पै म्हणाले, जुलैच्या मध्यात मान्सुनने संपर्ण देशाला व्यापलेले असेल. पुढील 24 तासांमध्ये उत्तर भारतातील काही भागात चांगला पाऊस होईल.

पुढील स्लाइडमध्ये, कोकणासह मुंबई-पुणे परिसरात पावसाची हजेरी