आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kerla Polytechnic College Publish Photo Of Narendra Modi With Laden Hitler

लादेन, हिटलरबरोबर छापला मोदींचा फोटो, प्रिंसिपलसह डावे समर्थक विद्यार्थ्यांवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दहशतवादी ओसामा बिन लादेन आणि हुकुमशाहा हिटलरबरोबर छापल्याचे प्रकरण समोर आले आहे. केरळच्या कुझूर येथील एका सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयातील हे प्रकरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी आपल्या कॅम्पसमधील नियतकालीकासाठी नकारात्मक व्यक्तींची यादी प्रकाशित केली होती. या यादीमध्ये त्यांनी जर्मनीचा हुकूमशाह हिटलर, जगातील तत्कालीन सर्वात क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेन, लिट्टेचा प्रमुख व्ही प्रभाकरण, चंदन सक्र वीरप्पन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज डबल्यू बुश यांच्याबरोबर नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नियतकालीकाशी संबंधीत चार विद्यार्थी, प्रिंसिपल एम.एन.कुट्टी, स्टाफ एडिटर गोपी आणि प्रिंटींग प्रेसचे मालक यांच्यावर भादंविच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2013-14 या आर्थिक वर्षासाठी हे नियतकालीक चार जून रोजी प्रकाशित करण्यात आले होते. त्याच्या एका पानावर हे सर्व नकारात्मक चेहरे छापण्यात आले असून त्यात मोदींच्या फोटोचा समावेश आहे.

एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या सर्वांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. हे नियतकालीक संस्थेकील संपादकांची एक टीम प्रकाशित करत असते. येथील विद्यार्थी संघटना डाव्यांची समर्थक आहे. पॉलिटेक्निकच्या अधिका-यांनी या नियतकालीकावरुन वाद उफाळल्याने ते मागे घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि या नियतकालीकाच्या प्रति जाळल्या.

फोटो : पॉलिटेक्निक कॉलेजच्या नियतकालीकात प्रकाशित करण्यात आलेले फोटो