आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती निवडणूक : त्रिपुरा, यूपीसह गुजरातमध्ये क्रॉस व्होटिंग, 20 जुलै रोजी मतमोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या 14 व्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवारी) सकाळी 10 वाजता मतदानास सुरुवात झाली. खासदार आणि आमदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केले. राष्ट्रपती निवडणुकीत 3 राज्यांमध्ये क्रॉस व्होटिंगचे वृत्त आहे. त्यामध्ये त्रिपुरा, यूपी आणि गुजरातचा समावेश आहे. 
 

रालोआचे उमेदवार रामनाथ काेविंद व विरोधी आघाडीच्या मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. सुमारे 63% मतांसह कोविंद यांचा विजय निश्चित मानला जातो. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत खासदार व राज्यांतील आमदार मतदान करतात. मतदान 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून मतमोजणी 20 रोजी होणार आहे.

पहिल्या दिवशीच कामकाज स्थगित...
- राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अम‍ित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

सदारांसाठी संसद भवन, तर आमदारांसाठी त्या-त्या राज्यांतील विधानसभांमध्ये मतदानाची सोय करण्यात आली. असे असले तरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह 55 खासदारांनी आपापल्या राज्यांत मतदान करण्याची परवानगी घेतली. मतदान सकाळी 10 पासून सायं 5 पर्यंत चालले. मतदान संपताच मतपेट्या विमानाने संसद भवनातील स्ट्राँग रूममध्ये पाठवण्यात आल्या. यांची मोजणी 20 तारखेला होणार आहे.

खासदार- आमदार मतदान केंद्रात स्वत:चा पेन नेऊ शकत नाहीत. ते म्हैसूरला डिझाइन केलेल्या पेनानेच मत देतील. मतदान केंद्राबाहेर उभा कर्मचारी त्यांना हा पेन देईल. गेल्यावेळी हरियाणात राज्यसभेसाठी सुभाष चंद्रांच्या निवडणुकीत चुकीच्या पेनाने मतदान केल्यामुळे अनेक मते रद्द झाल्यावरून वाद उद्भवला होता.

खासदारांसाठी हिरव्या रंगाची मतपत्रिका तर आमदारांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल.
एकूण 32 मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. एक केंद्र संसद भवनात असून राज्य विधानसभांमध्ये एक-एक केंद्र असेल. आयोगाने 33 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. दोन संसद भवनात व उर्वरित एक-एक राज्य विधानसभांमध्ये असेल. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. नवे राष्ट्रपती 25जुलै रोजी शपथ घेतील.

एकूण मते : 776 खासदार व 4120 आमदार
मतांचे एकूण मूल्य : 10 लाख 98 हजार 903
जिंकण्यासाठी आवश्यक : 5,49,452
एका खासदाराच्या मताचे मूल्य : 708
आमदाराचे मूल्य राज्याच्या लोकसंख्येनुसार निश्चित आहे.

रामनाथ कोविंद : जवळपास 63%
रालोआ : 48 %, अण्णाद्रमुक, बीजद, टीआरएस, जदयू, वायएसआर काँग्रेस व इनेलोही सोबत. त्यांची मते 15% 

मीरा कुमार : 34%
काँग्रेस 15%, तृणमूल काँग्रेस, सप, बसप, राजद, डावे पक्ष, आप, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेससह 18 पक्षांची मोट. त्यांची मते 19%.
 
हेही जरूर वाचा
बातम्या आणखी आहेत...