आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Key Lessons For BJP, Congress After Defeat In Delhi Election

LESSON'S : पराभवाच्या राखेतून भरारी घेण्यासाठी भाजप, काँग्रेसने घ्यावेत हे 9 धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या वर्षी याच सुमारास सत्ता सोडलेल्या आम आदमी पार्टीने जोरदार पुनरागमन करत सत्ता मिळवली आहे. आपच्या या वादळी लाटेमध्ये भाजप 3 जागांसह नावाला श्वास घेत आहे. तर काँग्रेस मात्र पुरते वाहून गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या पराभवानंतर भाजप आणि काँग्रेसने धडा घ्यायला हवा. अशाच महत्त्वाच्या 9 बाबी.

केवळ मोदी लाटेवर निवडणुका जिंकता येत नाहीत
प्रत्येक गोष्टीचा प्रभाव काळानुरुप कमी होत जातो, या नियमात पंतप्रधान नरेंद्र मोदी अडकले. एकापाठोपाठ एक ज्या राज्यांच्या निवडणुका होत आहेत त्यात मोदींचा करिश्मा हळू हळू ओसरत असल्याचे चित्र समोर येत आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर तर दिल्लीत झालेला पराभव हा भाजपचा पहिलाच पराभव म्हणावा लागेल. केवळ मोदी लाटेवर निवडणुका जिंकता येणार नाही हे भाजपने लक्षात घ्यायला हवे.

दिल्लीतील शक्ती बनत आहे AAP
आपला लोकसभा निवडणुकीत काहीही स्थान मिळाले नाही त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर अद्याप आपची ताकद दिसत नसली तरी दिल्लीच्या राजकारणात हा एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर आला आहे. आता पंजाब हे आपच्या अजेंड्यावरील पुढील राज्य असणार आहे. भाजपने आता राज्यांच्या निवडणुकांमध्ये आत्मसंतपष्टीपणाची भूमिका सोडायला हवी. तर काँग्रेसला खूप काही वेगळे करून दाखवावे लागणार आहे.

काँग्रेसची पडझड सुरुच
काँग्रेसला दिल्लीत एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीए 2 च्या कार्यकाळात झालेले घोटाळे आणि इतर मुद्यांचा विसर दिल्लीच्या जनतेला अद्याप पडलेला नाही. त्यात आता राहुल गांधींच्या नेतृत्वावरून आणखी एक नवीन मुद्दा सुरू होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, भाजप आणि काँग्रेससाठी धडा ठरतील अशा इतर बाबी...