आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KG Basin Scam: Mukesh Ambani Name Not Mentioned In FIR On Gas Prices

केजी बेसिन घोटाळ्यात एफआयआर दाखल, मुकेश अंबानी - वीरप्पा मोईलींचे नाव नाही !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कृष्णा गोदावरी (केजी) बेसिन घोटाळ्याची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केल्यानंतर आज (बुधवार) त्यांनी एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी, पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांचे नाव नाही. कोणतीही तक्रार आल्यानंतर त्याचा एफआयआर दाखल करणे ही प्राथमिक कारवाई असते. सुत्रांच्या माहितीनुसार, एफआयआर भारतीय दंड संहिता कलम 420 आणि 120 बी आणि भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या विविध कलमांनुसार दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव तक्रारदार म्हणून आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन नैसर्गिक वायू निर्मितीत घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता. त्यांचा आरोप होता, माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा आणि विद्यमान पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्याशी हातमिळवणी करून नैसर्गिक वायूचे (नॅचरल गॅस) दर वाढवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या ताब्यातील गॅस बेसिनमधून मुद्दाम कमी गॅसची निर्मिती करीत आहे.
याशिवाय, हायड्रोकार्बनचे माजी महासंचालक व्ही. के. सिब्बल यांचेही नाव केजरीवाल यांनी घेतले होते.
केजरीवालांकडे कोणी केली होती तक्रार
केंद्रीय कॅबिनेटचे माजी सचिव टी. एस. आर.सुब्रह्मण्यम, माजी केंद्रीय सचिव ई. ए. एस. सरमा, माजी नौदलप्रमुख अँडमिरल आर. एच. ताहिलियानी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील कामिनी जयस्वाल यांनी याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या.