आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाला शिकवण्याचा सलमान यांचा ध्यास, भारतात हिंदी पोर्टल लाँच,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अभिनेता सलमान खानला न्यायालयाने निर्दोषत्व बहाल केल्यानंतर सर्वत्र त्याच्याच नावाची चर्चा सुरू होती. मात्र, याचदरम्यान आणखी एका सलमान खानला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांचा संबंध चित्रपटसृष्टीशी नाही. मात्र, फॅन फॉलोइंगमध्ये कोणत्याही स्टारला ते मागे टाकू शकतात. कारण त्यांच्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म खान अकादमीत जगभरातील १९० देशांतील ३ कोटी ३५ लाखांहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे सर्वांना नि:शुल्क शिक्षण दिले जाते.

प्लॅटफॉर्मवर कोणतीही जाहिरात नाही. शिकवणाऱ्याला कोणत्याही सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. जागतिक स्तरावर शिक्षण-कोणीही आणि कधीही साध्य करू शकतो. खान अकादमीचे सलमान खान यांनी गेल्या आठवड्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा ट्रस्टसोबत पाच वर्षांचा करार केला. खान अकादमीचे हिंदी पोर्टलही लाँच करण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या मुलांना एनसीईआरटी अभ्यासक्रमाची सामग्री उपलब्ध आहे. साधारण २००० व्हिडिओ गणित विषयांचे आहेत. आगामी पाच वर्षांमध्ये मराठी, तामिळ आणि बांगला आदी भाषांमध्येही साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्लॅटफॉर्मवरील अभ्यासपत्रिका, व्हिडिओ, डॅशबोर्ड अॅनलिटिक्स आणि शिक्षण टूलचा समावेश आहे. यातून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरही शिक्षणाची सुविधा मिळेल.

सलमान खान यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी यांची सिलिकॉन व्हॅलीत भेट घेतल्यानंतर त्यांनी त्या महिन्यातच शैक्षणिक सुविधा देण्याचे ठरवले होते. २००४ मध्ये आपली १२ वर्षांची बहीण नादियाला गणिताचे काही प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांना हे यश प्राप्त झाले आहे. सध्या ४४० कोटी प्रश्नांची उत्तरे त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. जगभरात ३६ भाषांत त्यातील मजकुराचे भाषांतर केले जात आहे. साइटवर १३ लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत शिक्षक आहेत.
बातम्या आणखी आहेत...