आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील राष्ट्राध्यक्षांचे खानसामे एकत्र; शेफ्स परिषदेत १७ देशांतील बल्लवाचार्य सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगभरात विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष शिखर परिषद आणि अन्य कार्यक्रमांतून एकमेकांना भेटत असतात. मात्र, सध्या दिल्लीत त्यांच्या खानसाम्यंाची “शेफ्स परिषद भरली आहे.’ यामध्ये ओबामा, महाराणी एलिझाबेथ, फ्रान्स्वा ओलांद, प्रणव मुखर्जी यांच्यासह देशातील १७ पेक्षा जास्त देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे खानसामे एकत्र आले आहेत.

सर्व जण आपापल्या बॉसना आवडणाऱ्या डिशेस शेअर करत आहेत. एकमेकांची चांगली माहिती व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. प्रणव मुखर्जी यांचा खासगी खानसामा मोंट सैनी सर्वांचे आदरातिथ्य करत आहेत.

शेफ क्लबचे संस्थापक गिलेस ब्रागार्द म्हणाले, राष्ट्राध्यक्ष दरवर्षी भेटत असतात. शक्तिशाली देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या खानसाम्यांनी का एकत्र येऊ नये,असा विचार आला. राजकारण लोकांचे विभाजन करत असेल तर चांगल्या जेवणाने सजवलेला टेबल एकमेकांशी जोडतो. वर्षभरात एकदा खानसामे भेटल्यानंतर सर्व त्या देशातील स्थानिक पदार्थांचा आनंद घेतात. मेळाव्याच्या निमित्ताने सर्व दिल्लीत आहेत. पाहुणे भारतीय पदार्थांची चव चाखत आहेत. यामध्ये प्रसिद्ध स्ट्रीट फूड गोलगप्पा आणि आलू टिक्की, पकोडा, जिलेबी,चटपटीत चटणी आदींचा समावेश आहे. मोंट म्हणाले, सर्वजण विदेशातील आहेत. त्यंाना रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ खाता येत नाहीत. त्यामुळे हॉटेलमध्येच तसे पदार्थ तयार केले जात आहेत. सध्या विदेशी खानसाम्यांना रस्त्यावरील पदार्थ आवडत आहेत. चांदनी चौकातील गल्ली आणि दीपावलीचा झगमगाटही भावला. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसाठी खानसामा म्हणून काम केलेले बर्नार्ड बोसां म्हणाले, पदार्थ खूप छान, थोडीफार घाण, गोंगाट असला म्हणून काय झाले. हा वेगळा अनुभव आहे. तरी स्ट्रीट फूडचा अनुभव सर्वांसाठी चांगला नव्हता. मोंटू यांना ज्या गोष्टीची भीती होती तसेच झाले. एक पाहुणा आजारी पडला तर अन्य एकाचे पोट बिघडले. इटलीच्या राष्ट्राध्यक्षांचे शेफ फाबारित्सियो बोका म्हणाले, चार-पाच दिवस मसालेदार खाल्ल्यास तशी अवस्था होते. सवय होण्यास वेळ लागतो. अमेरिकेच्या क्रिस्टेटा मकरफर्ड यांना भारतीय खाद्यपदार्थ आवडतात. हे अन्नपदार्थ रेसिपीतून बनत नाहीत, तत्त्वज्ञानातून बनते, असे त्या म्हणतात. फिलिपाइन्सच्या पदार्थात हा तडका मी लावेल. या खानसाम्यांमध्ये हॉटलाइन असून त्यास ब्लू टेलिफोन संबोधले जाते. यावर राष्ट्राध्यक्षांच्या आवडीच्या पदार्थावर चर्चा होते.

काय आवडते त्याची क्लब सदस्यांना माहिती
क्लब डेस शेप्स डेस शेफ्स म्हणजे बॉसच्या खानसाम्यांचा क्लब याचे आयोजन दरवर्षी करतो. याची सुरुवात १९७७ मध्ये पॅरिसमध्ये झाली होती. जगभरातील शक्तीशाली व्यक्तींना काय आवडते हे माहीत असणारे लोकच या क्लबचे सदस्य असतात. त्यांना वर्षांतून एकदा विदेशात फिरण्यासाठी सुटी मिळते. दिल्लीत आलेल्या खानसाम्यामध्ये १६ पुरुष, क्रिस्टेटा कमरफर्ड या महिला शेफ आहेत.
बातम्या आणखी आहेत...