आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khap Ordered To Rape Girl For His Brothers Misdeed

भावाने मुलीला पळवले म्हणून बहिणीवर बलात्कार करण्याचा खापचा 'फतवा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या एका खाप पंचायतीने भावाच्या कृत्याबाबत त्याच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा आणि त्यानंतर गावातून नग्न फिरवण्याचा आदेश दिला आहे. हा मुलगा गावातील जाट समुदायाच्या एका विवाहीत तरुणीबरोबर पळून गेला होता. त्यानंतर बागपत जिल्ह्यातील खाप पंचायतीने 30 जुलैला बैठकीत हा निर्णय सुनावला. 23 वर्षाच्या मुलीने या प्रकारानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेत स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

प्रकरण काय?
याचिका दाखल करणाऱ्या पीडितेनुसार तिचा भाऊ आणि दुसऱ्या समुदायातील एक मुलगी यांच्यात तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण होते. याच वर्षी जानेवारी महिन्यात या मुलीच्या संमतीशिवायच तिचा विवाह जाट समुदायाच्या एका मुलाबरोबर लावून देण्यात आला. लग्नाच्या एका महिन्यानंतर ही मुलगी सासरहून प्रियकराबरोबर पळून गेली. पण तिचे कुटुंबीय आणि यूपी पोलिस यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे दोघांनी सरेंडर केले होते. दरम्यान मुलगी गर्भवती असल्याने तिला तिच्या कुटुंबीयांबरोबर पाठवण्यात आले. तर मुलाला ड्रग्ज विक्रीच्या बनावट खटल्यात अडकवून तुरुंगात पाठवण्यात आले.

काय म्हणाले पीडितेचे वकील?
पीडितेचे वकील विवेक सिंह यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैला जाट समुदायाच्या वतीने खाप पंचायत बोलवण्यात आली होती. या मुलाच्या बहिणीवर म्हणजे पीडितेवर बलात्कार करण्याचा आणि तिच्या चेहऱ्यावर काळे फासून तिला गावात नग्न फिरवण्याचा आदेशही देण्यात आला.

भीतीने गावातही परतले नाही...
सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारी मीना (नाव बदललेले) ने आरोप आरोप केला की, पोलिसांनी तिच्या भावाच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यासाठी जाट समुदायाच्या वतीने दबाव टाकण्यात आला. एका स्थानिक कोर्टाने या मुलीच्या भावाला जामीन दिला. तरीही लोकांच्या भीतीने पीडिता किंवा तिच्या कुटुंबीयांना गावातून जामीनासाठी कागदपत्रेही आणता आली नाही. त्यादरम्यान मीनाचे कुटुंब दिल्लीला आले. त्यानंतर जाट समुदायाच्या लोकांनी गावातील त्यांच्या घराची तोडफोड केल्याचे वृत्त आहे.

पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
याचिकेवरील सुनावणीदरम्यान जस्टिस जे चेलामेश्वर यांच्या नेतृत्वातील बेंचने उत्तर प्रदेश पोलिसांना नोटिस जारी केले आहे. मीना यांनी आरोप केला होता की, जाट समुदायाच्या लोकांबरोबर मिळून पोलिस अत्याचार करत आहेत. त्यावर कोर्टाने मीनाने केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीबाबत केलेल्या याचिकेसंदर्भात पोलिसांची प्रतिक्रिया विचारली आहे.