आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिचडी होईल राष्ट्रीय अन्न, आंतरराष्ट्रीय फूड म्हणून ब्रँडिंगही होणार; 4 नोव्हेंबरला घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तांदळाची खिचडी आता राष्ट्रीय खाद्यपदार्थ होत आहे. दिल्लीत ३-५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या वर्ल्ड फूड इंडियात याची घोषणा होऊ शकते. खिचडीला यात औपचारिकरीत्या भारतीय व्यंजन म्हणून दर्जा मिळेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर खिचडीचा प्रचार करण्याचीही केंद्राची एक योजना आहे. अन्नप्रक्रिया मंत्रालयाने केंद्र सरकारला हा प्रस्ताव पाठवला होता. यात खिचडीचे जे महत्त्व सांगण्यात आले त्याच्याशी केंद्रही सहमत होते. आता ४ नोव्हेंबरला ‘वर्ल्ड फूड इंडिया’त खिचडी तयार करण्याचा विक्रम केला जाणार आहे. यात ८०० किलो खिचडी असेल. गिनीज बुकात याची नोंद होऊ शकते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू याचे उद््घाटन करतील.
 
खिचडी का महत्त्वाची... तीन कारणे
१ गरीब असो वा श्रीमंत... सर्वांचीच फेवरेट
खिचडी असा पदार्थ आहे जो श्रीमंत असो किंवा गरीब. सर्वांनाच आवडतो. हीच खिचडी हॉटेल आणि रेस्तराँमध्ये मेनू म्हणूनही समाविष्ट असतो.
 
२ देशभर आवडीचे अन्न, स्वादिष्ट व पौष्टिकही
डाळ, तांदूळ आणि काही मसाल्यांचा वापर करून चवदार खिचडी तयार केली जाते. ही खिचडी चवदार तर लागतेच, शिवाय पौैष्टिकही असते.
 
३ लवकर तयार तर होतेच, शिवाय खर्चही कमी...
चवदार खिचडी तयार करण्यासाठी महागडा कोणताही पदार्थ वापरला जात नाही. शिवाय अशी खिचडी तयार करण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो. 
 
प्रत्येक देशाचा एक पदार्थ असतो खास
प्रत्येक देशातील लोकांच्या खाण्याच्या आवडीवर एक व्यंजन राष्ट्रीय खाद्यान्न म्हणून निवडण्यात आले आहे. तेच देशाचे खास व्यंजन म्हणून ओळखले जात असते.
 
- अमेरिकी व्यंजन : हॅमबर्गर, हॉटडॉग
- चिनी व्यंजन : नूडल्स, पेकिंग डक
- पाकिस्तानी व्यंजन : बिर्याणी
- इंग्रजी व्यंजन : बीफ, चिकन मसाला

1000 किलोची खिचडी बनवणार
दिल्लीत येत्या 3 नोव्हेंबरला 'विश्व खाद्य भारत' संमेलनास प्रारंभ होत आहे. केंद्रीय अन्न व आणि नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे 4 नोव्हेंबरला 'इंडिया गेट लॉन'वर शेफ संजीव कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली 1000 किलोची खिचडी बनविण्यात येणार आहे.

'गिनीज बुक'मध्ये मिळेल खिचडीला स्थान...
भारतीय खिचडीला 'गिनीज बुक आफ वर्ल्ड रिकॉर्ड'मध्ये स्थान मिळावे, अशी अपेक्षा संजीव कपूर यांनी व्यक्त केली आहे. उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की, गुरुनानक जयंतीला खिचडीला राष्ट्रीय खाद्य पदार्थाचा दर्जा मिळाणार आहे. ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. 1000 किलोची खिचडी बनविली जाणार आहे. विदेशी पाहुण्यासोबतच सामान्यांनाही वाटण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...