आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Khooni Panja\' Gets Narendra Modi Into Trouble; EC Issues Notice

\"खुनी पंजा\" उल्लेख भोवला, नरेंद्र मोदी अडचणीत, निवडणूक आयोगाकडून नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- "खुनी पंजा" असा उल्लेख करून निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आज (बुधवार) नोटीस बजावली. यापूर्वी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेही आयोगाच्या रडारवर आले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी "खुनी पंजा" उल्लेखावर 16 नोव्हेंबरपूर्वी स्पष्टीकरण द्यावे, असे निवडणूक आयोगाने बजावले आहे. छत्तीसगडमधील निवडणूक रॅलीत नरेंद्र मोदी यांनी "खुनी पंजा" असा कॉंग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख केला होता. निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाचा असा उल्लेख झाल्याने कॉंग्रेसने याची आयोगाकडे तक्रार केली होती.
याबाबत कॉंग्रेसच्या कायदा आणि मानवाधिकार विभागाचे सचिव के. सी. मित्तल म्हणाले होते, की पंजा आमचे निवडणूक चिन्ह आहे. छत्तीसगडमधील निवडणूक रॅलीत मोदींनी याचा "खुनी पंजा" असा उल्लेख केला. या वक्तव्याने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे आणि हे कॉंग्रेसची प्रतिमा मलिन करणारे आहे. त्यामुळे आम्ही मोदी आणि भाजपविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मोदी "जालिम हाथ"ही म्हणाले होते, वाचा पुढील स्लाईडवर