आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंगफिशर हाऊसला खरेदीदार मिळेना, जेटली म्हणाले- माल्यांकडून पै-पै वसूल करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंगफिशर हाऊस एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनीला फेब्रुवारी 2015 मध्ये लिलावासाठी देण्यात आले होते. - Divya Marathi
किंगफिशर हाऊस एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनीला फेब्रुवारी 2015 मध्ये लिलावासाठी देण्यात आले होते.
नवी दिल्ली - विजय माल्यांकडून थकित कर्ज वसुलीसाठी त्यांच्या मुंबईमधील किंगफिशर एअरलाइन्स ऑफिसचा आज लिलाव होणार आहे. इ-ऑक्शन सकाळी 11.30 वाजता सुरु झाला आहे. डोमेस्टिक एअरपोर्ट जवळील विलेपार्ले येथील 2401 स्केअर मीटरवरील किंगफिशर हाऊसची बँकांनी बेस प्राइज 150 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. माल्यांच्या संपत्तीमधील ही सर्वात मोठी संपत्ती मानली जाते. दरम्यान जेटलींनी माल्यांकडून पै-पै वसूल करणार असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले जेटली
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, 'आम्ही बँकांना सांगितले आहे की माल्यांकडून एक-एक पैसा वसूल करा. माल्या प्रकरणात देशाची आणि बँकिंग क्षेत्राची प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही यावर उपाययोजना केली नाही तर भविष्या ते धोकादायक ठरु शकते.'
- जेटली गुरुवारी 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह' मध्ये माल्या संबंधीच्या प्रश्नाला उत्तर देत होते.
कोण करणार लिलाव, माल्यांना कोणत्या बँकेचे किती द्यायचे
- 31 जानेवारी 2014 पर्यंत किंगफिशर एअरलाइन्सवर बँकांच्या कर्जाची रक्कम 6963 कोटी रुपये होती. या कर्जावर लागलेल्या व्याजासह ही रक्कम आता 9000 हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे.
- किंगफिशर हाऊसचा लिलाव स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या नेतृत्वातील बँकांचा समुह करणार आहे.
- यात एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनी लिमिटेडचा समावेश आहे. या कंपनीने फेब्रुवारी 2015 मध्ये किंगफिशर हाऊस ताब्यात घेतले होते.
- हा ई-लिलाव सिक्युरिटाइजेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फाइनेंशियल अॅसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट 2002 अंतर्गत होत आहे.
- अशी माहिती आहे, की हॉटेल इंडस्ट्रीज संबंधित काही कंपन्या खरेदीसाठी उत्सूक आहेत.
- किंगफिशर एअरलाइन्स ऑक्टोबर 2012 मध्ये बंद पडली. डिसेंबर 2014 मध्ये त्याचे फ्लाइंग परमिट रद्द करण्यात आले आहे.
बँकाना माल्यांकडून किती वसूल करायचे ? (आकडे कोटींमध्ये )

एसबीआय-1600
पीएनबी-800
आयडीबीआय-800
बँक ऑफ इंडिया- 650
यूनाइटेड बँक ऑफ इंडिया-430
सेंट्रल बँक ऑफ इंडिया-410
यूको बँक - 320
कॉर्पोरेशन बँक -310
स्टेट बँक ऑफ म्हैसूर-150
इंडियन ओवरसीज बँक -140
फेडरल बँक - 90
पंजाब अँड सिंध बँक -60
एक्सिस बँक -50
पुढील स्लाइडमध्ये, माल्या F-1 रेसिंगसाठी जाणार की ED समोर हजर होणार
बातम्या आणखी आहेत...