आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kinner Marries With God Aravn And Widowed Next Day

येथे देवाशी लग्न करून दुस-याच दिवशी विधवा होतात किन्नर, पाहा PHOTO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - तामिळनाडूच्या अरावन देवतेची पुजा केली जाते. त्यांना इरावन असेही म्हटले जाते. या देवाला येथे किन्नरांची देवता असेही संबोधले जाते. दक्षिण भारतात किन्नरांना अरावनीही म्हटले जाते. किन्नर आणि अरावन देवतेचा वर्षातून एकदा विवाह होत असतो. पण हा विवाह केवळ एका दिवसाचा असतो. दुस-या दिवशी या देवतेचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर विवाह केलेले किन्नर विधवा होतात. पण ही देवता नेमकी कोण आहे? किन्नर त्यांच्याशी विवाह का करतात? तेही एका दिवसासाठीच का?

महाभारत काळापासून संबंध
पूर्ण दक्षिण भारतात महाभारताच्या कथेनुसार त्या काळात एकदा अर्जुनाला द्रोपदीबरोबर लग्नाची अट मान्य न केल्याने इंद्रप्रस्थमधून बाहेर काढून देण्यात आले होते. अर्जुनाला एका वर्षासाठी तीर्थयात्रेला पाठवण्यात आले. तेथून निघाल्यानंतर अर्जुन उत्तर पूर्व भारतात जातो. तेथे त्याची भेट एका विधना नाग राजकुमारी उलुपीबरोबर होते. दोघे एकमेकांवर प्रेम करू लागतात. काही दिवसांपूर्वी उलूपी आणिअर्‍जुन विवाह करतात. विवाहानंतर काही काळाने उलुपी एका मुलाला जन्म देते. त्याचे नाव ती अरावन ठेवते. आपल्या मुलाच्या जन्मानंतर अर्जुन त्या दोघांना सोडून पुढच्या यात्रेसाठी निघून जातो. अरावन नागलोकात आपल्या आईबरोबरच राहत असतो. तरुणपणी तो नागलोक सोडून आपल्या पित्याकडे येतो. तेव्हा कुरूक्षेत्रात महाभारताचे युद्ध सुरू असते. त्यामुळे अर्जुन त्याला युद्धासाठी रणभूमीत पाठवतो.

युद्धात केला होता प्राणत्याग
महाभारताच्या युद्धात एक अशी वेळ येते जेव्हा पांडवांना विजयासाठी काली मातेच्या चरणी स्वच्छेने एक नरबळी द्यायचा असतो. त्यावेळी अरावन स्वतः त्यासाठी पुढे येतो. पण अरावत अविवाहीत राहून बळी देणार नसल्याचे सांगतो. त्यावेळी सगळ्यांसमोरच समस्या उभी राहते. आपली मुलगी दुस-याच दिवशी विधवा होईल म्हणून कोणीही त्याच्याबरोबर मुलीचा विवाह लावून देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे श्री कृष्ण स्वतः मोहिनी पूप धारण करून अरावनबरोबर विवाह करतात. दुस-या दिवशी अरावत स्वतः आपले सीर काली मातेला अर्पण करतो. अरावनच्या मृत्यूनंतर श्री कृष्ण त्याचरुपात बराच काळ दुःख व्यक्त करतात. श्री कृष्ण पुरुष असून स्त्री रुपात अरावनबरोबर विवाह करतात. त्यामुळे स्त्री रुपातील पुरुष म्हणून ओळखळे जाणारे किन्नर ही अरावन देवतेशी एका रात्रीपुरता विवाह करत असतात. व त्यांनाच अराध्य देवता मानतात.
कूवगममध्ये मुख्य मंदिर
आता तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये अरावन देवाची मंदिरे तयार होतात. पण त्यांचे सर्वात प्राचीन आणि मुख्य मंदिर विल्लुपुरम जिल्ह्यातील कूवगम गावात आहे. या मंदिरात अरावन देवाच्या केवळ डोक्याची पुजा केली जाते. राजस्थानच्या खाटू श्यामजीमध्येही अशीच केवळ बर्बरीकच्या डोक्याचीच पुजा केली जाते.
किन्नरांचा सर्वात मोठा उत्सव
कूवगम गावात दरवर्षी 18 दिवस चालणा-या या उत्सवाची सुरुवात होत असते. देशभरातून त्यासाठी किन्नर जमा होत असतात. सुरुवातीचे 16 दिवस गाण्यांवर नाचगाणे सुरू असते. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात विवाहाची तयारी सुरू असते. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट सुरू असतो. 17 व्या दिवशी पुजारी 17 एक खास पुजा करतात. देवाला नारळाची भेट दिली जाते. त्यानंतर अरावन देवासमोर पुजा-याकरवी किन्नरांच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. त्याला थाली म्हटले जाते. नंतर मंदिरात अरावनाच्या मूर्तीशी विवाह लावला जातो. अखेरच्या म्हणजे 18 व्या दिवशी कूवगम गावात अरावनाच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. नंतर ती मूर्ती नष्ट केली जाते. त्यानंतर नवरी बनलेले किन्नर त्यांचे मंगळसूत्र तोडून टाकतात. तसेच चेह-यावरील श्रृंगारही काढला जातो. नंतर ते पांढरे वस्त्र परिधान करतात आणि दुःख व्यक्त करतात. त्यानंतर हा उत्सव संपतो. पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याची वचने देऊन सगळे आपापल्या घरी परततात.
(छायाचित्रे संग्रहित)
पुढील स्लाइड्सवर पाहा किन्नरांच्या लग्नाचे काही आणखी फोटो...