आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiran Bedi BJP's Chief Minister Cadidate In Delhi Assembly Elections

दिल्ली निवडणुकीत किरण बेदी भाजपच्या मुख्‍यमंत्री पदाच्या उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाचच दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या किरण बेदी यांना पक्षाने दिल्लीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एखाद्या राज्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला. याआधी महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये पक्षाने मोदींच्याच नावावर निवडणुका लढवल्या होत्या.

भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बेदींच्या नावाची घोषणा केली.दिल्लीत भाजपकडे सीएमपदाचा चेहरा नव्हता. नेमका हाच मुद्दा हेरून केजरीवाल व त्यांचा पक्ष प्रचार करत होते. यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार म्हणून भाजपने किरण बेदींना निवडले.त्या पक्षाच्या परंपरागत कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. यासोबतच पक्षाने दिल्लीतील सर्व ७० पैकी ६२ जागांचे उमेदवार घोषित केले. भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या विरूद्ध नवी दिल्लीतून नुपूर शर्मा यांना मैदानात उतरवले आहे.