आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiran Bedi BJP\'s Chief Minister Candidate In Delhi Assembly Elections

अवघ्या पाच दिवसांत किरण बेदी बनल्या CM पदाच्या उमेदवार, वाचा \'केजरी V किरण\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाचच दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना पक्षाने दिल्लीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केले आहे. यापूर्वी महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुका लढवल्या. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एखाद्या राज्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला आहे.

भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बेदींच्या नावाची घोषणा केली. दिल्लीत भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हता. नेमका हाच मुद्दा हेरून केजरीवाल व त्यांचा पक्ष प्रचार करत होते. यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार म्हणून भाजपने किरण बेदींना निवडले.त्या पक्षाच्या परंपरागत कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. यासोबतच पक्षाने दिल्लीतील सर्व 70 पैकी 62 जागांचे उमेदवार घोषित केले. भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या विरूद्ध नवी दिल्लीतून नुपूर शर्मा यांना मैदानात उतरवले आहे.

पहिल्या दिवशीच मिळाले होते संकेत...
15 जानेवारी- भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरण बेदी यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे आधीच संकेत मिळाले होते. ‍किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थित बेदी यांनी पक्षप्रवेश केला.
16 जानेवारी- दुसर्‍या दिवशी किरण बेदी यांचे भाजप कार्यालयात जोरदार स्वागत करण्‍यात आले. 'मुख्यमंत्री बनली तर सकाळी नऊ वाजताच घराबाहेर पडेल. परिणामी सर्व विभागांचे सचिव देखील घराबाहेर पडतील. सर्व मिळून जनतेच्या समस्या सोडवू', असे किरण बेदी यांनी सांगितले.

17 जानेवारी- किरण बेदी यांनी दिल्ली महापालिकेचे महापौर आणि अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. बैठकीत एमसीडीवर चर्चा झाली. दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाल्यास एमसीडीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे किरण बेदी यांनी स्पष्ट केले. 'स्वच्छ भारत अभियान'चे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.

18 जानेवारी- दिल्लीतील सर्व खासदारांना आपल्या घरी चहापानासाठी बोलावले. मात्र, उशीरा पोहोचलेले केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्यासाठी त्या घरी न थांबता पुढील कार्यक्रमासाठी त्या निघून गेल्या.

19 जानेवारी- राजकारणात पदार्पण केल्यापनंतर पहिल्यांदा किरण बेदी यांनी सर्व वृत्त वाहिन्यांना आपला इंटरव्ह्यु दिला. दिल्लीसाठी त्यांचे व्हिजन सां‍गितले. 'मीडियाला देण्यात आलेली माहिती ही अधिक फुलवून सांगण्यात आली आहे. भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे दिसले नाही.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, दिल्लीत मोदींना दिसला आशेचा ‘किरण’!