आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kiran Bedi Claims Receiving Life Threats And Bomb To Be Placed In His Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Delhi Election : ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी दिली जात असल्याचा किरण बेदींचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - किरण बेदींनी केलेले धमकीसंदर्भातील ट्वीट
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी त्यांचे कार्यालय बॉ़म्बने उडवण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा केला आहे. कृष्णानगर येथे असलेल्या याच कार्यालयावर सोमवारी हल्ला करण्यात आला होता.
मंगळवारी किरण बेदी ट्वीटद्वारे म्हणाल्या, या लूझर्सना काय झाले आहे? कृष्णानगर मतदारसंघात माझे ऑफिस असलेल्या घराच्या मालकाला धमकी दिली जात आहे. कार्यालयात बॉम्ब ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. भाजपवाल्यांना हाकलून लावा अशी धकमी कार्यालयाच्या मालकाला दिली जात आहे. सोमवारी कृष्णानगर परिसरातील याच कार्यालयावर सुमारे एक हजार वकिलांनी हल्ला करत तोडफोड केली होती. त्याबाबतही किरण बेदी यांनी ट्वीटरद्वारेच माहिती दिली होती.

वकिलांनी केली तोडफोड
कृष्णानगर भाजप कार्यालयाचे प्रभारी रत्नेश विश्नोई यांनी हल्ला करण्यासाठी आलेले वकील होते, असा आरोप केला आहे. ते म्हणाले, 1000 हून अधिक वकील मोर्चा घेऊन आले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड सुरू केली. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते. आंदोलकांना कार्यालयाबरोबरच बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोडही केली. तसेच किरण बेदी यांच्या विरोधात अश्लाघ्य घोषणाही दिल्या होत्या.
पुढील स्लाइडवर पाहा, सोमवारी वकिलांना काढलेल्या मोर्चाचा PHOTO