आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiran Bedi Cleans And Lala Lajpat Rais Statue Road Show For Delhi Election

किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज; लाजपत राय यांच्या पुतळ्याला अर्पण केला दुपट्टा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आज (बुधवारी) दिल्लीतील कृष्णानगर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांनी आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला. 'रिझल्ट फर्स्ट क्लास फर्स्ट' असेल, असे किरण बेदी यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.
दिल्ली निवडणुकीत भाजप 'गोल्ड मेडल' घेऊन येणार असल्याचे बेदींनी सांगितले. कृष्णानगर विधानसभा क्षेत्र हे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या तपश्चर्येचे फळ आहे.

दुसरीकडे, कॉंग्रेसचे नेते अरविंदर सिंह लवली यांनी किरण बेदींवर टीका केली आहे. किरण बेदी यांनी संपूर्ण देशातील जनतेला अपमान केला आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी, असे लवली यांनी म्हटले आहे.

देशसेवेचे व्रत स्विकारण्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांचे आशीर्वाद घेण्यात कोणतीही चूक नसल्याचे सांगत डॉ.हर्षवर्धन यांनी किरण बेदी यांची पाठराखण केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे. त्यात भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आज (बुधवारी) एक नवा वाद ओढवून घेतला आहे. स्वतंत्रसैनिक लाला लाजपत राय यांच्या पुतळ्याला भाजपचे निवडणूक चिन्ह 'कमल' असलेला दुपट्टा अर्पण केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा अाज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी निघालेल्या किरण बेदी यांनी लाजपत चौकात मतदारांना संबोधित केले. यादरम्यान किरण बेदी यांनी लाला लाजपत राय याच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यास पोहोचल्या. सगळ्यात आधी किरण बेदी यांनी स्वत:च्या गळ्यातील दुपट्ट्याने पुतळा स्वच्छ केला. नंतर भाजपचे निवडणूक चिन्ह 'कमळ' असलेला दुपट्टा लाला लाजपत राय यांना अर्पण केले. यावरून किरण बेदी यांच्यासह भाजपवर चहुबाजुंनी टीका सुरु झाली आहे.

राष्ट्रपुरुषांचा अपमान; कॉंग्रेसने साधले शरसंधान
किरण बेदी यांनी शहिद स्वातंत्रसैनिक लाला लाजपत राय यांचा अपमान केल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. भाजपने यापूर्वी राष्ट्रपुरुषांचा अवमान केला आहे. मात्र, किरण बेदी यांनी तरी असे करायला नको होते. जनता सर्व काही पाहात असल्याचे कॉंग्रेसच्या प्रवक्ता मीम अफजल यांनी म्हटले आहे.

भाजपचा केवळ देखावा....
दुसरीकडे,आम आदमी पक्षाने (आप) किरण बेदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वातंत्र्य संग्रामात राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते घरात लपून बसले होते. आज मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना स्वातंत्रसैनिकांची आठवण झाली असल्याची टीका, 'आप'चे प्रवक्ता आशुतोष यांनी केली आहे.