आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण बेदी यांचा भाजपमध्ये प्रवेश, दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किरण बेदी यांचे स्वागत करताना अमित शहा)
नवी दिल्ली - अण्णा हजारेंच्या आंदोलनातून समोर आलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गुरुवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितश शाह आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीमध्ये बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असणार की नाही याचा निर्णय पक्ष घेणार असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे किरण बेदी दिल्ली निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असतील या चर्चांवर पडदा पडला आहे. बेदी यांच्या प्रवेशाने दिल्लीत पक्षाची प्रतिमा उंचावणार असल्याचेही शहा म्हणाले.
किरण बेदी यांनी भाजप प्रवेश करण्यापूर्वी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यांच्याकडून आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रेरणा मिळाल्याचे किरण बेदी म्हणाला. मी समाजिक कार्यातच जीवनभर राहण्याचे ठरवले होते. पण राजकारणात सक्रिय होण्याची प्रेरणा मला मोदींच्या नेतृत्त्व गुणामुळे मिळाल्याचे त्या म्हणाल्या. जीवनातील 40 वर्षे पोलिस विभागात काम केल्याने हा अनुभव दिल्लीकरांचे आयुष्ट सुकर करण्यासाठी वापरणार असल्याचे किरण बेगी म्हणाल्या. दिल्लीला सध्या एका अनुभवी आणि लोकहिताची कामे करणा-या सरकारची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत सगळे मिळून दिल्लीची स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करू अशा शब्दांत किरण बेदी यांनी जनतेला आव्हान केले.

त्याआधी बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी किरण बेदी यांचे स्वागत केले. समाजातील चांगल्या व्यक्तींना सोबत घेऊन काम करणे ही भाजपची सुरुवातीपासूनच भूमिका असल्याचे जेटली यावेळी म्हणाले. त्यांच्या पक्षात येण्याने भाजपला बळ मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
किरण बेदी यांच्या संदर्भातील माहिती जाणून घ्या पुढील स्लाईडवर....