आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiran Bedi Lost His Election From Krishna Nagar Assembly Constituency Says Wikipedia

\'किरण बेदींचा कृष्णनगरमधून पराभव\', मतदानाआधीच विकिपिडियाकडून निकाल जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीचा ज्वर जोरात चढला असतानाच विकिपिडियाने मात्र भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचा कृष्णनगर मतदारसंघातून पराभव झाल्याचे जाहीर केले आहे. किरण बेदींचा केवळ पराभव झाल्याचे विकिपिडियावर दाखवले नाही तर त्यांना 5 हजार 450 मते मिळाल्याचे म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे एस.के. बग्गा यांना विजयी उमेदवार दाखवताना त्यांना 92 हजार 654 मते मिळाल्याचे म्हटले आहे तर काँग्रेसच्या बन्सीलाल यांना केवळ 985 मते मिळाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर दिल्ली विधानसभा अस्तित्त्वात आल्यापासून पाच निवडणुकीत हर्षवर्धन निवडून आल्याचे दाखविण्यात आले तर सहाव्या टर्म ( 2015- 2010) मध्ये आपचे बग्गा यांना निवडून आल्याचे दाखविले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पक्षात जोरदार टक्कर सुरु आहे. यात आपने भाजपपेक्षां किंचित आघाडी घेतल्याचे विविध वाहिन्यांचे म्हणणे आहे. तसेच भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींपेक्षा केजरीवाल अधिक सरस मुख्यमंत्री ठरतील असे दिल्लीकर म्हणत असतानाच विकिपिडियाने किरण बेदींना पराभूत दाखविल्याने भाजपला मानसिकरित्या निश्चितच धक्का बसणार आहे.
पुढे पाहा, विकिपिडियाने काय दाखवले आहे...