आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiran Bedi Lost His Election From Krishna Nagar Assembly Constituency Says Wikipedia

...आणि विकिपीडियाचे किरण बेदींच्या पराभवाचे भाकीत खरे ठरले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचा कृष्णनगर मतदारसंघातून पराभव झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र, किरण बेदींचा पराभव झाल्याचे मागील आठवड्यातच विकिपिडियावर दाखवले गेले होते. विकिपीडियाचा हा अंदाज अथवा चूक आता बरोबर ठरली आहे.
आम आदमी पक्षाचे उमेदवार एस.के. बग्गा यांनी किरण बेदींना सुमारे अडीच हजार मतांनी धूळ चारली. कृष्णनगर ही सीट भाजपची सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. कारण दिल्ली विधानसभा अस्तित्त्वात आल्यापासून या मतदारसंघातून भाजप व पर्यायाचे त्यांचे नेते हर्षवर्धन निवडून आले आहेत. यंदा मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत बाहेरील उमेदवार किरण बेदींना तिकीट दिले होते.
काय म्हटले विकिपीडियाने मागील आठवड्यात
आम आदमी पक्षाचे एस. के. बग्गा यांना विजयी उमेदवार दाखवताना त्यांना 92 हजार 654 मते मिळाल्याचे विकिपीडियाने मागील आठवड्यातच दाखवले होते तर काँग्रेसच्या बन्सीलाल यांना केवळ 985 मते मिळाल्याचे दाखवले होते. याचबरोबर दिल्ली विधानसभा अस्तित्त्वात आल्यापासून पाच निवडणुकीत हर्षवर्धन निवडून आल्याचे दाखविण्यात आले तर सहाव्या टर्म (2015- 2010) मध्ये आपचे बग्गा यांना निवडून आल्याचे दाखविले होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पक्षात जोरदार टक्कर सुरु होती. विविध वाहिन्यांनी केलेल्या सर्व्हेत आपला बहुमत मिळेल असे म्हटले होते. असे असले तरी आपला एवढा मोठा विजय मिळेल व काँग्रेससोबत भाजपचाही दिल्लीत संपूर्ण सफाया होईल असे भाकीत कोणीही वर्तवले नव्हते.
पुढे वाचा, का जिंकले बग्गा...