आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण बेदींना 'हुकूमशहा' संबोधणार्‍या मनोज तिवारींचा यू टर्न, रोहिणीमधून रोड शोला सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - रोहिणी परिसरात किरण बेदी यांनी रोड शोची सुरुवात केली.
नवी दिल्ली - भाजपच्या नेत्या किरण बेदी यांनी दिल्लीच्या रोहिणी परिसरातून सोमवारी रोड शोची सुरुवात केली. काही मिळवण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केलेला नाही, तर सेवाभावाने राजकारणात प्रवेश केला आहे, असे किरण बेदी यांनी रोड शो दरम्यान स्पष्ट केले. तिवारींनी तर डिक्टेटरशिप (हुकूमशाही) योग्य नसल्याचे वक्तव्यही केले आणि काही वेळातच आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतला.

दरम्यान, किरण बेदींच्या भाजप प्रवेशामुळे पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष प्रखरपणे समोर आला आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख जगदीश मुखी आणि उत्तर पूर्व दिल्लीचे लोकसभा खासदार मनोज तिवारी यांनी बेदींचा खुलेआम विरोध केला. तिवारींनी तर डिक्टेटरशिप (हुकूमशाही) योग्य नसल्याचे वक्तव्यही केले. तर रमेश बिधूड़ी यांनी किरण बेदींचे समर्थन केले. तिवारी यांनी काही वेळातच आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतला.
तिवारी म्हणाले डिक्टेटरशिप अयोग्य
त्यांच्या टी पार्टीत जाने मला योग्य वाटले नाही. पक्षाध्यक्ष अमित शहांनी मला बोलावले असते तर मी जरूर गेलो असतो. पण एखाद्याने कालच पक्षात प्रवेश घ्याला आणि आम्हाला बोलवावे हे ठीक नाही. माझ्या नेत्यांनी मला बोलावले नव्हते, म्हणून मी गेलो नाही, असे भाजप खासदार मनोज तिवारी यांनी स्पष्ट केले. बेदी यांच्या पक्षात प्रवेश केल्याने आपण आनंदी आहोत. मात्र मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भाजप ठरवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एखाद्याने स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराप्रमाणे प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जातो, असेही तिवारी म्हणाले. हर्षवर्धन रविवारी किरण बेदींच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये उशीराने पोहोचले होते. त्यामुळे किरण बेदींशी त्यांची भेट झाली नाही आणि त्यांना चहाही मिळाला नाही. यासंदर्भात एवढ्या मोठ्या नेत्याला अशी वागणूक देणे योग्य नसून, हा डिक्टेटरशीपचा प्रकार असल्याचे तिवारी म्हणाले.

बेदींबाबत मत विचारात घेतले नाही : मुखी
जगदीश मुखी म्हणाले की, किरण बेदी यांना पक्षात घेण्याबाबत पक्षाच्या दिल्ली विभागातील कार्यकर्त्यांची मते विचारली गेली नाहीत. तसेच पक्षाच्या इतर नेत्यांनाही विचारण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या नेतृत्त्वाने बेदींच्या पक्षातील प्रवेशाबाबत निर्णय घेतल्याचे मुखी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. बेदींच्या भाजप प्रवेशापूर्वी मुखी यांनाच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जात होते. मुखी विरुद्ध केजरीवाल असे पोस्टरही दिसत होते. पण बेदींच्या पक्ष प्रवेशानंतर सगळीच स्थिती बदलली.