आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारोंनी योग केल्याने पडला पाऊस, राजपथावर योगानंतर किरन बेदींचे Twitt

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हजारो लोकांनी एकत्रित योग केल्यामुळे पाऊस पडल्याचे किरण बेदी यांनी म्हटले आहे. राजपथावरील योग कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले. राजपथावर योग करतानाचा सेल्फीही त्यांनी ट्विट केले. राजपथावरील योगाचा कार्यक्रम संपताच थोड्याच वेळात पाऊस पडल्याने सुंदर वातावरण तयार झाले होते.

ट्विटमध्ये उल्लेख
राजपथावरील कार्यक्रमानंतर बेदी यांनी काही ट्विट केले. त्यापैकी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, एकाच वेळी शांती, शांती, शांती के च्या उच्चारामुळेच दिल्लीत मान्सूनपूर्व सरी कोसळून गर्मी कमी झाली आहे. नंतर एका ट्विटमध्ये त्यांनी सेल्फीही पोस्ट केले. त्यात त्यांनी आवाहन केले की, जर याठिकाणी येता येत नसेल तर तुम्ही तुमच्या घरीच योगा करा. आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत त्यांनी मोदींचे कौतुकही केले.

किरण बेदींचे ट्विट
Kiran Bedi ‏@thekiranbedi यांनी ट्विटवर म्हटले की, राजपथावर योगा आणि मंत्रोच्चारानंतर पाऊस झाला ही काय गंमत आहे?
(My tweet on rains following chanting from Yog/Rajpath which was a welcome relief gave some an opportunity to interpret it literally! Funny?)

बेदींच्या ट्विटनंतर काँग्रेस प्रवक्त्यांनी केलेले ट्विट
बातम्या आणखी आहेत...