फोटो - किरण बेदी आणि अनु यांचे संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली - दिल्लीत निवडणुकांचे वातावरण तापायला लागले आहे. किरण बेदी आणि त्यापाठोपाठ शाजिया इल्मींच्या प्रवेशानंतर भाजप या निवणुकीत कोणतीही कसर सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. किरण बेदी दिल्ली भाजपचा एक नवा चेहरा आहेत. तसेच त्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारही आहेत. भारताच्या पहिल्या महिला आयपीएस असलेल्या किरण यांचा जन्म दिल्लीतच झाला होता. त्यांना तीन बहिणी होत्या, अनु, रीता आणि शशी.
तीन बहिणींपैकी अनु पेशवारिया या सध्या अमेरिकेत अॅटर्नी आहेत. भारताच्या टेनिस जगतामध्ये त्यांचे मोठे नाव होते. विम्बल्डनमध्ये भारताला त्यांच्याकडून विजयाची अपेक्षा होती. पण ते होऊ शकले नाही. सध्या त्या अमेरिकेत वकिली करत असून तेथील NRI महिलांसाठी एक भक्कम आधार बनल्या आहेत. कॅलिफोर्नियाच्या फ्रेमंटमध्ये राहणार्या अनु अनिवासी भारतीय दिनासाठी भारतात येतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी अनिवासी भारतीय महिलांसाठी ‘द इमिग्रेंट्स ड्रीम’ नावाचे पुस्तकही लिहिले होते. यात परदेशात अपमानाला सामोरे जावे लागलेल्या भारतीय महिलांच्या कथा आहेत.
महिलांना मोफत सल्ला
अनु या अमेरिकेत सेवा लिगल एड फाऊंडेशनही चालवतात, त्या माध्यमातून एनआरआय महिलांना मोफत कायदेशीर सल्ला दिला जातो. एवढ्या सगळ्या व्यापातही त्यांनी टेनिसची आवड जोपासली आहे. टेनिसच्या शॉट्स मधून जीवनातील चढ उतारांबाबत बरेच शिकायला मिळते असे त्या म्हणतात. पंजाबी महिलांवर परदेशात होणार्या गैरवर्तनाबाबत त्या गुरुद्वारांमध्ये जाऊन वर्कशॉपही घेतात.
‘टेक अॅक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स’ पुरस्काराने सन्मान
नुकताच त्यांना ‘टेक अॅक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचे वय 55 वर्ष आहे. त्यांच्या वडिलांचे नाव प्रकाशलाल पेशावरिया आणि आई प्रेमलता आहे. अनु यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए पूर्ण केले. तसेच सांता क्लारा यूनिव्हर्सिटीमधून साइबर लॉमध्ये पदवी पूर्ण केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा. अनु पेशावरिया यांचे Photo's