आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किरण बेदींनी गुरुद्वाऱ्यात केली सेवा, तर अरविंद केजरीवालांनी केला योगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी भाजप आणि आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांनी दिवसाची वेगवेगळी सुरुवात केली. भाजपच्या उमेदवार किरण बेदी शुक्रवारी सकाळी कृष्णा नगर परिसरात एका गुरुद्वाऱ्यात पोहोचल्या. याठिकाणी त्यांनी लंगरसाठी रोट्याही तयार केल्या. तर केजरीवाल यांनी सकाळची सुरुवात योगाने केली. त्यानंतर ते केस कापण्यासाठी गेले.
फोटो : गुरुद्वाऱ्यात सेवा करताना किरण बेदी.
बेदी म्हणाल्या, लहानपणापासून जाते गुरुद्वाऱ्यात
दिल्लीच्या कृष्णा नगर येथील गुरुद्वाऱ्यात गेलेल्या किरण बेदी म्हणाल्या की, मी लहानपणापासून गुरुद्वाऱ्यात सेवा करण्यासाठी सात असते. मी अमृतसरच्या मंदिरातही जायचे. शाळेत मॉर्निंग प्रेयर करायचे. तर मुस्लीम बांधव माझ्या शेजारी राहत होते. त्यामुळे सर्वधर्म समभावाच्या वातावरणात माझी वाढ झाली आहे, असेही त्या म्हणाल्या.

केजरीवाल म्हणाले, घसा ठीक असेल तर कोल्ड ड्रींक पितो
शुक्रवारी सकाळी गाझियाबादच्या कौशांबी येथील निवासस्थानी माध्यमांसी बोलताना केजरीवाल म्हणाले की, मला कोल्ड ड्रींक्स खूप आवडतात. 49 दिवसांच्या सरकारदरम्यान मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर चहा प्यायला असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.
आईने सांगितले, केजरीवालांना आवडचे डायट कोल्ड ड्रींक
केजरीवाल यांच्या निवासस्थानी जेव्हा माध्यमाचे प्रतिनिधी पोहोचले त्यावेळी त्यांच्या आई म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असल्याने ते गोड पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना दाळ भात फार आवडतो असेही त्यांनी सांगितले, त्याचबरोबर केजरीवाल यांना डायट कोल्ड ड्रींक आवडत असल्याचेही ते म्हणाले.
पुढील स्लाइडवर पाहा, केजरीवाल यांचे योगा करतानाचे PHOTO