आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiran Bedi Will Not Accept Arvind Kejariwal Challenge

INSIDE STORY: सगळ्यांनी दिला नकार, केजरीवालांविरूद्ध नुपूर शर्मांना दिली उमेदवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपमध्ये प्रवेश करून पाच दिवस झाले नाही तोच किरण बेदी यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मात्र, 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध निवडणूक रिंगणात उतरणार नाही, अशी किरण बेदी यांनी अट घातली आहे. त्यामुळे अखेर अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे 'नॅशनल मीडिया'च्या प्रभारी नुपूर शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
नवी दिल्‍ली मतदार संघातून नुपूर शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपमध्ये यापूर्वी प्रवेश केलेल्या जवळपास सगळ्यांनी केजरीवाल यांच्या विरोधात लढण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे नवी दिल्लीतून उमेदवारी देताना भाजप नेत्यांना मोठी कसरत करावी लागली.

किरण बेदी किंवा शाझिया इल्मी यांना केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवावी, यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. किरण बेदी यांनी केजरीवालांच्या विरोधात निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला. दुसरीकडे, इल्मी यांनी तर निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले आहे.
एम.एस. धीर आणि अशोक चौहान यांनी देखील नवी दिल्लीतून निवडणूक लढण्यास नकार दिला होता. केजरीवाल यांना आव्हान देण्यास कोणीच तयार न झाल्याने अखेर भाजपने नुपूर शर्मा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपला उमेदवारी यादीत अंतिम क्षणी बदल करावे लागले. सोमवारी रात्री संसदीय आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत केजरीवाल यांच्या विरोधात विनोदकुमार बिन्नी यांना उतरण्यावर चर्चा झाली. मात्र, बिन्नी पटपडगंज मतदार संघातून लढण्यावर अडून बसले आहे. कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या कृष्णा तीरथ यांना देखील नवी दिल्लीतून लढणाविषयी विचारण्यात आले होते. मात्र, तीरथ यांनी देखील स्पष्ट नकार दिला. पटेल नगरातून उमेदवारी मिळावी, म्हणून तीरथ यांनी म्हटले आहे.

अखेर नुपूर शर्मांच्या नावावर शिक्कामोर्तब...
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढण्यात अनेक दिग्गज नेत्यांनी स्पष्ट नकार दिला. नुपूर शर्मा यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. नूपूर शर्मा यांनी विदेशात शिक्षण घेतले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात वाकयुद्ध सुरु