आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री रिजीजूंसाठी आर्मी ऑफिसरच्या कुटुंबाला विमानातून उतरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजीजू देखील विमान लेट केल्यामुळे वादात अडकले आहेत. रिजीजू यांनी केवळ विमानालाच उशिर केला नाही तर, त्यांच्याआधी योग्य तिकीटासह बसलेल्या तीन प्रवाशांना उतरवून रिजीजू यांनी विमान प्रवास केला.ज्या प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले त्यात एक आर्मी ऑफिसर, त्यांची पत्नी आणि मुलगा होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसाठी तीन प्रवाशांना विमानातून उतरवून देण्याची घटना लेह येथील आहे. एका 35 सेकंदाच्या व्हिडिओतून याचा खुलासा झाला आहे. एअर इंडियाच्या रिपोर्टमध्येही मंत्री महोदयांसाठी तीन प्रवाशांना उतरवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. जेव्हा आर्मी ऑफिसरच्या कुटुंबाला उतरवले जात होते, तेव्हा एका प्रवाशाने त्याचा व्हिडिओ शुट केला. त्यात रिजीजू देखील दिसत आहेत. ते सिंधू दर्शन कार्यक्रमासाठी लेह येथे गेले होते.

रिजीजू म्हणाले, तिकीट कसे मिळाले मला माहित नाही
केंद्रीय गृहमंत्री रिजीजू यांच्यावर विमान लेट केल्याचा आरोप झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, 'खराब हवामानामुळे बीएसएफचे हेलिकॉप्टर उड्डाण करु शकत नव्हते. आम्ही लेह प्रशासनाला एअर इंडियाच्या विमान तिकीटाची व्यवस्था करण्यास सांगितली. लेह प्रशासनाने कशा पद्धतीने आम्हा तिकीट मिळवून दिले याची माहिती मला नाही. नंतर कळाले की आमच्यासाठी तीन प्रवाशांना उतरवण्यात आले, पण मी अशा गोष्टीचे समर्थन करत नाही.'
मुख्यमंत्री सचिवांसाठी विमान तासभर लेट
अशीच घटना मंगळवारी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत घडली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी वैध व्हिसा असलेला पासपोर्ट सोबत घ्यायचे विसरल्याने अमेरिकेला जाणारे विमान फडणवीसांनीच तासभर मुंबई विमानतळावर थांबवले होते.

मुख्यमंत्री फडणवीस शिष्टमंडळासह सोमवारी पहाटे एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार होते. त्यांच्या प्रधान सचिवांना चेक इनमध्ये क्लिअरन्स मिळाले; परंतु विमानात जाताना त्यांच्या पासपोर्टवर व्हिसा नसल्याने त्यांना रोखले. हा नवा पासपोर्ट असून आपला व्हिसा जुन्या पासपोर्टवरचा आहे, पण तो घरी राहिला, असे ते म्हणाले. परंतु त्यांना अमेरिकी व्हिसाचा जुना पासपोर्ट आणावाच लागला. त्यात तासभर गेला. ताेपर्यंत फडणवीसांनी विमान थांबवून ठेवले. जुना पासपोर्ट तपासल्यानंतर विमानाने प्रयाण केले, अशी माहिती एअर इंडियातील सूत्रांनी दिली