आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसान’ने दिला अमिताभला ६.३१ कोटी रुपये ‘हमी भाव’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या डीडी किसान चॅनलसाठी असलेल्या ४५ कोटी तरतुदीपैकी प्रसार भारतीने तब्बल ६ कोटी ३१ लाख रुपये अमिताभ बच्चनला ब्रँड अॅम्बेसेडर करण्यासाठी मोजले. ही रक्कम एकूण रकमेच्या १५ % आहे.
प्रसार भारतीने अभिनेता सलमान खान, अजय देवगण व काजोलशीही संपर्क साधला होता.शेवटी लिंटास कंपनीने अमिताभ व दूरदर्शनमध्ये हा करार करून दिला. त्यापैकी ४ कोटी अमिताभला रोख देऊनही टाकले.

बिग बीची जादूही कुचकामी!
अमिताभला ब्रँड अॅम्बेसेडर करूनही किसान चॅनलला फारसा फायदा झाला नाही. या चॅनलची प्रेक्षकसंख्या केवळ ३६ लाख आहे. दुसरीकडे एका बँडविड्थवर प्रसारित होऊनही डिस्कव्हरी चॅनलची प्रेक्षक संख्या ४ कोटी ३० लाख आहे.
बातम्या आणखी आहेत...