आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD: किशोर कुमार यांच्या गाण्यांवर आणीबाणीच्या काळात होती बंदी, का म्हणायेच स्वतःला खंडवेवाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घातली गेली होती. - Divya Marathi
आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घातली गेली होती.
नवी दिल्ली - किशोर कुमार यांची गाणी आवडत नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मात्र स्वतंत्र भारतातील काळेकुट्ट दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घातली गेली होती, हे फार कमी लोकांना माहित असेल. जादुई आवाजाचे धनी किशोर कुमार यांची शुक्रवारी जयंती आहे. यानिमित्ताने divyamarathi.com सागंत त्यांच्याबद्दलच्या आठवणी... 
 
आणीबाणीच्या काळात लेखक, पत्रकार, राजकारणातील विरोधक यांचा आवाज दाबण्याचे काम झाले. 25 जून 1975 ला तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री असलेले विद्या चरण शुक्ला यांनी किशोर कुमार यांची गाणी रेडिओ आणि दुरदर्शनवर पूर्णपणे बॅन केली होती. 
 
असे म्हटले जाते की तत्कालिन मंत्री शुक्ला यांनी किशोर कुमार यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. आणीबाणीमुळे देशातील जनता इंदिरा गांधींवर नाराज होती. तो काळ काँग्रेससाठी मोठा नाजूक होता आणि किशोर कुमार हे यशाच्या शिखरावर होते. जनमाणसाच्या मनावर त्यांचे गाणे राज्य करत होते. त्यामुळे विद्या चरण शुक्ला यांनी किशोर कुमार यांना मुंबईतील काँग्रेसच्या सभेत गाणे गाण्याचा प्रस्ताव ठेवला. 
 
किशोर कुमार हे तत्वाचे पक्के होते. त्यांनी काँग्रेसच्या सभेत गाणे गाण्यास नकार दिला होता. हे तेव्हाच्या काँग्रेसी नेत्यांच्या जिव्हारी लागले. त्यानंतर ऑल इंडिया रेडिओ आणि दुरदर्शनवर किशोर कुमार यांची गाणी प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात आली. साधारण तीनवर्षे ही बंदी होती. मात्र कोंबडं झाकून ठेवल्याने उगवाये राहात नाही, त्याच प्रमाणे किशोर कुमार यांना या बंदीमुळे काहीही फरक पडला नाही. 
 
 मध्य प्रदेशातील खंडवा येथे जन्म 
 - किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला मध्यप्रदेशातील खंडवा येथे झाला होता. 
 - अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते 'मी किशोर कुमार खंडवेवाले' असे मोठ्या उत्साहात सांगत. 
 
'पाच रुपये बारा आणे' होती कॉलेज कँटिनची उधारी 
- किशोर कुमार यांचे महाविद्यालयीन शिक्षण इंदूर येथील ख्रिश्चियन कॉलेजमध्ये झाले. त्यावेळी कॉलेज कँटिनमध्ये स्वतः खाणे आणि मित्रांनाही खाऊ घालणे हा त्यांचा आवडता छंद होता. हे करत असताना कँटिनची त्यांच्यावर उधारी होत होती. 
- किशोर कुमार यांच्यावर कँटिनवाल्याची पाच रुपये बारा आणे उधारी होती. तो नेहमी त्यांना उधारी मागायचा आणि किशोर कुमार वेगवेगळ्या धुनवर पाच रुपये बारा आणे गाऊन त्याची मागणी ऐकून न ऐकल्यासारखे करायचे. 
- 'चलती का नाम गाडी' चित्रपटातील एका गाण्यात त्यांनी याच 'पाच रुपया बारे आणे'चा खुबीने वापर करुन ती उधारी अजरामर करुन टाकली, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
बातम्या आणखी आहेत...