आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kishor Says Shourie Is An Old And Personal Friend

प्रशांत किशोर भेटले अरुण शौरींना; जाणून घ्या, कसे तुटत गेले भाजपपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रशांत किशोर यांनी गुजरातमध्ये मोदींची निवडणूक स्ट्रॅटेजी ठरविली होती - Divya Marathi
प्रशांत किशोर यांनी गुजरातमध्ये मोदींची निवडणूक स्ट्रॅटेजी ठरविली होती
नवी दिल्ली - बिहार विधानसभेत नितीशकुमारांच्या जनता दल संयुक्त आणि महाआघाडीला शानदार विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता दिल्लीत आले आहेत. गुरुवारी त्यांनी मोदी विरोधी गटाचे प्रमुख नेते अरुण शौरींची भेट घेतली. माध्यमांमध्ये अशीही चर्चा आहे की प्रशांत यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचीही भेट घेतली. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवानंतर शौरींनी मोदी-शहा जोडीवर जोरदार हल्ला चढवला होता.

काय म्हणाले प्रशांत
अरुण शौरींची भेट झाल्याचे प्रशांत किशोर यांनी मान्य केले. या भेटीत काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असून प्रशांत म्हणाले, शौरी माझे जुने मित्र आहेत.

का आहे या भेटीची चर्चा
>> बिहार विधानसभेतील पराभवानंतर मोदी-शहा जोडी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निशाण्यावर आहेत.
>> दिवाळीच्या दिवशी ज्येष्ठ नेत्यांनी (लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि शांता कुमार) निवदेन प्रसिद्ध करुन मोदी-शहा जोडीवर निशाणा साधला होता.
>> ज्येष्ठ नेत्यांनी मागणी केली होती की बिहार विधानसभेत झालेल्या पराभवाची जबाबादारी निश्चित केली जावी.
>> 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधल्याचे बोलले जाते.

कसे भाजपपासून तुटत गेले प्रशांत किशोर
>> गुजारात विधानसभेच्या 2012 मधील निवडणुकीत आणि त्यानंतर 2014 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रशांत किशोर नरेंद्र मोदी आणि भाजपचे मुख्य निवडणूक रणनीतीकार होते.
>> लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या निवडणूक रणनीतीमधून हळुहळु प्रशांत किशोर यांना बाजूला ठेवण्यात येऊ लागले.
>> डिसेंबर 2014 मध्ये प्रशांत यांनी मोदींचा कंपू सोडला आणि बिहार विधानसभेत नितीशकुमारांना मदत करणे सुरु केले. याचे एक कारण - अमित शहा यांनी त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष्य असल्याचे सांगितले जाते. असे बोलले जाते की लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजपकडून त्यांना पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.
>> भाजपमधील हायकमांडला भीती होती की प्रशांत किशोर आणि त्यांची टीम पक्षात स्वतःची समांतर यंत्रणा तयार करेल. हेदेखिल प्रशांत आणि भाजप हायकमांडमध्ये मतभेद निर्माण होण्याचे कारण होते. त्यासोबत अमित शहांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले अभुतपूर्व यश फक्त प्रशांत यांच्या स्ट्रॅटिजीचे नव्हते असे वाटत होते.
>> माध्यमांमध्ये अशीही चर्चा आहे की सरकारमध्ये आपल्या स्थानाबद्दल 2014 मध्ये प्रशांत किशोर यांनी शहांना विचारले होते की जूननंतर काय होईल. यावर शहांनी प्रशांत किशोर यांना म्हटले होते, की प्रत्येक जूननंतर जुलै येतो. त्यांनी प्रशांत यांना सरकारमध्ये सामिल करुन घेण्यास काडीचेही महत्त्व दिले नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नितीशकुमारांसोबत प्रशांत किशोर