आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल: भारताने फ्रान्ससोबत केला ३६ राफेल्सचा सौदा; जाणून घ्या, काय आहे खास?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल जेट विमानांचा सौदा केला आहे. भारतासाठी हा सौदा अनेक बाबतींत महत्त्वाचा आहे. जाणून घेऊया या विमानाच्या बाबतीत काही खास गोष्टी...
राफेल काय आहे?
राफेलहे दोन इंजिन असलेले मल्टिरोल लढाऊ विमान आहे. याच्या डिझाइन-निर्मितीचे कार्य फ्रान्सची दसॉल्ट कंपनी करते. फ्रान्सचे हवाई दल, नेव्हीसाठी याची निर्मिती करण्यात आली होती. राफेलचे वैशिष्ट्ये म्हणजे हे विमान विविध सेन्सर्सच्या मदतीने संपूर्ण डाटा घेऊन वैमानिकाला एकाच डिस्प्लेमध्ये देते. याचे सेन्सर नियंत्रण उपयुक्त असून डिस्प्ले अत्यंत सोपा आहे.
कसा झाला सौदा?
१९९६मध्ये भारताने शेवटचे लढाऊ विमान खरेदी केले होते आणि २००७ मध्ये १२६ लढाऊ विमानांसाठी निविदा काढल्या होत्या. २००७ मधील तांत्रिक फेरीनंतर राफेल आणि टायफूनची निवड करण्यात आली. मात्र, २०१२ मध्ये सरकारने खरेदीसाठी राफेलची अंतिम निवड केली. आता कुठे सरकारने ३६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा सौदा केला आहे.

का आहे आवश्यक?
भारतीय हवाई दलात सध्या ३४ स्क्वॉड्रन्स आहेत, तर एका अंदाजानुसार सध्या पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याला सुमारे ४४ स्क्वॉड्रन्सची गरज आहे. त्यामुळे विमानांची संख्या वाढवावी लागेल.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, हे देखील जाणून घ्या