आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीकडून घेतलेल्या 10 हजार रुपयांत केली सुरुवात, आज आहे 2 लाख कोटींची कंपनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती. - Divya Marathi
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती.
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी 'इन्फोसिस'मध्ये सध्या बरेच फेरबदल होत आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तर, कंपनीच्या सह-संचालकांनी शेअर विक्री केल्याच्याही बातम्या येत आहेत. हे सर्व अशावेळेस घडत आहे जेव्हा कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती हे त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. इन्फोसिसच्या स्थापनेत आणि भरभराटीत नारायणमूर्ती यांचे योगदार फार मोठे आहे. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून इन्फोसिसचे रोपटे वाढवले होते. 
 
सुधा मूर्ती यांचा 19 ऑगस्टला वाढदिवस झाला, यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे या महाराष्ट्रीयन महिलेचा पतीच्या उद्योगातील सिंहाचा वाटा... 
बातम्या आणखी आहेत...