आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know More About Personal Life Of Arvind Kejriwal In Hindi

बालपणापासून हनुमानाचे भक्त असलेले केजरीवाल आता आहेत आमिर खानचे फॅन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी द‍िल्ली- देशाची राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असलेले आम आदमी पक्षाचे (आप) संयोजन अरविंद केजरीवाल यांचे आयुष्य संघर्षपूर्ण आहे. केजरीवाल बालपणी श्रीराम भक्त हनुमानाचे भक्त होते. आता मात्र बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचे चाहते आहेत.

आयआयटी उत्तीर्ण झाल्यानंतर टाटा कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी केली. नोकरी मधेच सोडून त्यांनी सहा महिने देशाचा दौरा केला. मदर टेरेसा यांची भेट घेऊन दीनदुबळ्यांची सेवा केली. त्यानंतर यूपीएससी सारखी कठीण परीक्षा पहिल्या फेरीत उत्तीर्ण होऊन आयआरएस बनले.
केजरीवाल यांना 'माहितीचा अधिकार'साठी मॅगसेसे पुरस्कार प्रदान करून सन्मानितही करण्यात आले होते. एखाद्या सामान्य माणसाने वरील पैकी एकही गोष्ट संपादन केली असती तर तो हवेत उडाला असता. अर्थात त्याला गर्व झाला असता. कशाला दुसर्‍यांच्या फंद्यात पडायचे, असेच त्याने म्हटले असते. परंतु आयआयटीची पदवी तसेच भारतीय राजस्व सेवेतील नोकरी सोडून जनतेच्या हक्कासाठी लढणारा 'आम आदमी'च राहण्याल्या केजरीवाल यांच्या मनात कधीच असे विचार आले नाहीत.

केजरीवाल यांच्या आयुष्यातील रोचक किस्से जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा....