आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिवस: पंतप्रधानांविरोधात याचिका, चीनमधून आल्या 37000 चटई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियाचीन बेस कँप येथे योग करताना भारतीय लष्कराचे जवान - Divya Marathi
सियाचीन बेस कँप येथे योग करताना भारतीय लष्कराचे जवान
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधात बिहारची राजधानी पाटणा येथील सीजेएम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सर्वांवर सरकारी खर्चाने योग दिवस साजरा करणे आणि धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करण्यात आला आहे. देवकुमार सिंह यांनी शनिवारी कोर्टात याचिका दाखल केली. त्यात म्हटले आहे, की एका मंत्र्याने बुकलेट तयार केली आहे त्यात नमाज आणि योग एकच असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
चीनमधून 37 हजार चटई
आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमीत्त दिल्लीत राजपथावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी चीनमधून 37000 हजार चटई मागवण्यात आली आहे. चटई विक्रेते आर्च लिमीटेडचे हितेंद्र ओबेरॉय म्हणाले, भारत सरकारने चीनच्या चटईला पंसती दिली होती. आम्ही त्यांना भारतीय चटई देखील दाखवली होती.
काँग्रेसचा आरोप
योग दिवसाच्या पूर्वसंध्येला राजपथावरील कार्यक्रमासाठी चीनहून चटई मागवण्याचा मुद्दा तापला आहे. काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते राज बब्बर म्हणाले, देशातील कार्यक्रमासाठी सरकारने चीनमधून चटई मागवली आहे. भारतात चटई बनवल्या जात नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस नेते पी.एल.पुनिया यांनी देखील चीनची चटई का ? असा सवाल सरकारला विचारला आहे. पुनिया म्हणाले, 'मोदी सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रमाची हवाच काढून घेतली आहे. योग दिनानिमीत्त भारतात बनवण्यात आलेल्या चटईचा वापर व्हायला हवा होता.' भाजपने काँग्रेसचे आरोप गैरलागू असल्याचे सांगत योग दिनावर फोकस करण्याची गरज असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...