नवी दिल्ली - दिल्लीलीतर वसंत व्हॅली शाळेतील नैना सिंहकडे पाहिल्यानंतर इतर मुलींप्रमाणेच ती दिसते. परंतू पहिले असे नव्हते. 16 वर्षांची नैना एक ट्रान्सजेंडर आहे. तिने लिंग बदल करुन एक नवा अध्याय सुरु केला आहे. नैना पहिले कृष्णा सिंह होता. लिंगबदल करुन ती मुलगी झाली आहे.
कृष्णाचे कुटुंबिय आणि तिच्या मित्रांना विश्वास बसत नाही की ती एक मुलगी आहे. कृष्णाची आई मिशी यांना प्रश्न पडला होता की आपला मुलगा गे आहे की काय. मात्र नंतर त्यांना कळाले की तो मुलगा नसून मुलगी आहे. नैनाच्या आई सांगतात, मला माझ्या मुलीची काळजी वाटते. लिंगबदल करण्याआधी मी तिला मार्केटमध्ये घेऊन गेले की रिमोट कंट्रोल कार आणि इतर खेळणे दाखवत होते, परंतू तिला सॉफ्ट टाइज जास्त आवडत होते.
नैना सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे. तिने यू-ट्यूबवर एक चॅनल सुरु केले आहे. नैनाच्या चॅनलवर अनेक व्हिडिओज अपलोड आहेत. त्यांना 30 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. नैना तिच्या व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यासमोर बसून तिचा कृष्णा ते नैनापर्यंतचा प्रवास कथन करते. त्याशिवाय तिच्या मेकअपचा व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आलेला आहे. नैनाला पाहून कोणाचाही विश्वास बसत नाही की पहिले ती मुलगा होती. काही दिवसांपूर्वी ती मुलांच्या कपड्यांमध्ये शाळेत जात होती, आज त्याच्या विरुद्ध तिेचे आचरण आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नैनासिंहचे काही निवडक फोटोज...