आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये कैदेत असलेल्या कुलभूषण जाधवला 25 डिसेंबरला भेटणार आई आणि पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/इस्लामाबाद - पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई 25 डिसेंबरला त्यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, त्यांनी याबाबत भारताला माहिती दिली आहे. जाधव भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी असून पाकने त्यांना बलुचिस्तानातून अटक केल्याचा दावा केला आहे. पाक लष्कराने त्यांना अशांतता पसरवणे आणि हेरगिरी केल्याच्या आरोपात फाशी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाने मात्र या फाशीवर स्थगिती लावली आहे. 


पाकिस्तानने काय म्हटले.. 
- भारत अनेक महिन्यांपासून मानवाधिकारांचा हवाला देत जाधवची आई आणि पत्नी यांच्यासाठी व्हिसा मागत होता. शुक्रवारी पाकिस्तातनने म्हटले की, आम्ही भारताला आमचा निर्णय कळवला आहे. पुढे ते म्हणाले, या भेटीदरम्यान भारतीय उच्चायुक्तालयातील एक अधिकारीही उपस्थित राहू शकतो. 
- पाकिस्तान भेटीदरम्यान जाधव यांच्या कुटुंबाला सुरक्षा प्रदान करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. आधी पाकिस्तानने फक्त जाधव यांच्या पत्नीलाच भेटण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर भारताने म्हटले होते की जाधव यांची आई अवंतिका यांनाही व्हिसा द्यायला हवा. 
- काही दिवसांपूर्वी सुषमा स्वराज यांनी जाधव प्रकरणी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांशी चर्चा केली होती. 


पाककडे 13 डिसेंबरपर्यंत वेळ 
- इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस ( ICJ) ने पाकिस्तानला लिखित उत्तर देण्यासाठी किंवा मेमोरियल सबमिट करण्यासाठी 13 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. म्हणजे या प्रकरणात पुढील कारवाई सुरू करता येऊ शकेल. 
- पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, जाधव यांनी पाकिस्तानात दहशतवादी कारवाया घडवून आणल्या होत्या, यावर आम्ही ठाम राहणार आहोत. 


ICJ ने काय म्हटले.. 
- इंटरनॅशनल कोर्टात भारताकडून वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी 8 मे ला याचिका दाखल केली होती. भारताने ही मागणी केली होती की, भारताचे मेरिट तपासण्याआधी जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणायला हवी. 
- कुलभूषण यांना पाककडून सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 मे रोजी स्थगिती लावली होती. या प्रकरणी निर्णय होईपर्यंत कुलभूषण यांना फाशी देता येणार नाही. 


इंटरनेशनल कोर्टाने काय म्हटले PAK ला?
जाधव यांच्या फाशीबाबत सुनावणी करताना कोर्टाने पाकिस्तानला स्पष्ट केले होते की, त्यांना कोर्टात हे पुराव्यानिधी सिद्ध करावे लागेल की, त्यांना ICJ ने जे आदेश दिले त्यांच्यावर कशाप्रकारे अंमलबजावणी केली जात आहे. 


काय आहे प्रकरण?
- पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने जाधवला हेरगिरी आणि देशविरोधी कारवायांच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताचे म्हणणे आहे की, जाधव यांचे इराणमधून अपहरणकरण्यात आले होते. भारतीय नौदलातून निवृत्ती घेतल्यानंतर ते इराणमध्ये व्यवसाय करत होते. 
- पण पाकिस्तानने दावा केला आहे की, जाधव यांना बलुचिस्तानातून 3 मार्च 2016 ला अटक करण्यात आली होती. पाकिस्तानने जाधव यांच्यावर बलुचिस्तानात अशांती पसरवण्याचा आरोप केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...