आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिजात संगीत कलेवर पोस्टाची अभनिव ‘मुद्रा’, ८ महान कलावंतांच्या तिकिटांचे विमोचन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनात बुधवारी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिवंगत नामंवत कलावंतांवर आधारित पोस्टल तिकिटांचे विमोचन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित समारंभात प्रसिद्ध संगीतकारांची एकत्रित तिकिटे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रकाशति करण्यात आली. संगीत क्षेत्रातील या आठ व्यक्तमित्त्वांमुळे भारतीय अभिजात संगीताच्या श्रीमंतीमध्ये निश्चितपणे भर पडली आहे. त्यांचे योगदान अद्वितीय आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांमध्ये नव्या-जुन्या पिढीचा समावेश होतो, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.


पं.भीमसेन जोशी, कुमार गंधर्व
पंडति रवशिंकर, पंडति भीमसेन जोशी, डी. के. पट्टम्मल, पंडति मल्लकिार्जुन मन्सूर, गंगुबाई हंगल, पंडित कुमार गंधर्व, उस्ताद विलायत खान आणि उस्ताद अली अकबर खान या मान्यवरांचा त्यात समावेश आहे.

छायाचित्र - आठ महान संगीतकारांच्या स्मरणार्थ तिकिटांचे प्रकाशन करताना राष्ट्रपती. सोबत माहिती-तंत्राज्ञानमंत्री रवशिंकर प्रसाद.