आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमार विश्वास म्हणाले, AAP मध्ये परतण्यासाठी प्रशांत भूषण-योगेंद्र यादव यांच्याशी चर्चा सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आम आदमी पार्टीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या गटाशी नाराजी असलेल्या कुमार विश्वास यांनी रविवारी एक धक्कादायक दावा केला. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले प्रशांत भूषण आणइ योगेंद्र यादव अशा नेत्यांना पुन्हा पक्षात बोलवण्यासाठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीबाल यांच्या नीकटवर्तीय नेत्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. पक्षविरोधी कारवायांच्या आरोपात यादव आणि भूषण यांची एप्रिल 2015 मध्ये आपमधून हकालपट्टी केली होती. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रशांत-योगेंद्र यांनी स्वराज इंडिया पक्ष स्थापन केला होता. 

 

AAP ला अँटी व्हायरसची आवश्यकता
- व्हॉलंटियर्सशी बोलताना विश्वास म्हणाले, जर कोणी इतर पक्षात गेलेले नसतील आणि त्यांना परतायचे असेल, कोणी राजकीय पक्ष स्थापन केला असेल आणि विलिन करायचा असेल तर शक्य आहे. यादी खूप मोठी आहे. सुभाष वारेपासून अंजली दमानियांपर्यंत, मयांक गांधी, धर्मवीर गांधींपासून प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादवपर्यंत. अशा नेत्यांबरोबर चर्चा सुरू आहे. चुका सुधारण्यासाठी आम्ही त्यांची माफी मागू. 
- कुमार यांनी पक्ष कार्यालयात म्हटले की, हे भीषण युद्ध आहे. अनेकांना अभिमन्यूचा वध करायचा असेल. पार्टीत काही अँटिव्हायरस लावले जात आहेत. हे कार्यकर्त्यांचे अँटि व्हायरस आहेत. कार्यकर्ते खरं सांगतील की, संघटनेत कुठे अडचणी आहेत आणि आमदार कसे काम करत आहेत. हे अँटि व्हायरस पार्टीला 'बॅक टू बेसिक' कडे घेऊन जाण्यास मदत करतील. 
- 26 नोव्हेंबरला पार्टीच्या स्थापना दिनी कुमार विश्वास यांनी रामलीला मैदानावर घोषणा केली होती की, ते दर रविवारी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकतील. त्यासाठी ते अनेक राज्यांतील कार्यकर्त्यांना भेटलेदेखिल. 


वैयक्तीक टीकेवर बोलणार नाही 
विश्वास म्हणाले की, पार्टीच्या ध्येयासाठी मी वारं वार आवाज उठवत राहील. त्याने काही नेत्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पण मला त्याच्याशी देणे घेणे नाही.  मी तर केवळ रामलीला मैदानावरील कोट्यवधी लोकांच्या स्वप्नावर लक्ष केंद्रीत करणार आहे. वैयक्तीक टीकेवर बोलणार नाही. 


वादग्रस्त व्हिडिओबाबत म्हणाले, रागात होते 
तीन दिवसांपूर्वी आलेल्या एका वादग्रस्त व्हिडिओबाबत कुमार यांनी माफी मागितली आहे. विश्वास म्हणाले की, 6 महिन्यांपूर्वी एका मुखवट्याद्वारे माझ्यावर काही खालच्या स्तरावरील आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे मी रागात होतो. त्यादरम्यान मी एका 40 वर्षे जुन्या मित्राच्या मेहुण्याशी बोललो होतो. उत्साहात चुकीचे शब्द तोंडून निघाले. आता सभ्यपणे बोलेल. 

 

 

बातम्या आणखी आहेत...